चंद्रपूर/प्रतिनिधी:
प्रत्येकाला वाटते आपल्या घरी पुत्र जन्मावा व तो असावा शिवाजी सारखा, मात्र माता पिता म्हणून आपली जबाबदारी आपण साफ विसरतो व आपल्या पुत्राला शिक्षकांच्या भरवश्यावर सोडून देतो आणि शिवाजी बनण्याची अपेक्षा करतो, शिवाजी ला घडवण्यात सर्वात जास्त योगदान माता पित्यांचे आहे.
करिता आपल्या अतिसंवेदनशील मुलामुलींना घडवन्याचे नियोजन आतापासूनच सुरू करा, हे नियोजन आपल्याला शिवरायांच्या ईतिहासातून शिकता येईल. असे विचार चंद्रपूर येथील शिवइतिहास अभ्यासक तसेच शिवरक्षक जिवाजी महाला पुस्तकाचे लेखक हरीश ससनकर यांनी सावली तालुक्यातील घोडेवाही येथे शिवजयंती व शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा उदघाटन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उदघाटन महाराष्ट्र विधानसभेचे उपगटनेते तथा सावली क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार हयांच्या हस्ते पार पडले तर अध्यक्षस्थानी मुल नगरपरिषद च्या अध्यक्ष रत्नमालाताई भोयर, प्रमुख अतिथी प्रभाकरराव भोयर, मनिषाताई चिमुरकर जि.प.सदस्य, छायाताई शेंडे सभापती पं.स.सावली, विजय कोरेवार पं.स.सदस्य, अविनाश पाल, स्वातीताई गावळे सरपंच घोडेवाही, प्रा.नरेंद्र आरेकर सहवक्ते, सुनील वैद्य मुख्याध्यापक हे होते.
कार्यक्रमाचे आयोजन संदीप चिमुरकर, विलास तिवाडे, विशाल वाढनकर, संजय रोहनकर व अन्य कार्यकर्ते राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक मंडळ घोडेवाही यांनी केले.