टेकाडी येथील भव्य दारु व्यसनमुक्ती महामेळावा संपन्न
चंद्रपूर/प्रतिनिधी:
दि.20/02/2019 ला मौजा टेकाडी ता.मूल जिल्हा चंद्रपूर येथील प.पूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना टेकाडी यांच्या वतीने दारू व्यसनमुक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उदघाटक मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार अर्थ,नियोजन वने मंत्री.(महा राज्य)तथा पालक मंत्री चंद्रपूर जिल्हा हे होते. कार्यक्रमाचे सहउदघाटक मा.चांदुपाटील मारकवार पंचायत राज तज्ञ समिती सदस्य. हे होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मा.देवराव भोंगळे जी.प.अध्यक्ष.मा नानभाऊ शामकुळे आमदार चंद्रपूर विधानसभा.मा.संध्याताई गुरनुले माजी जी.प.अध्यक्ष, मा.रत्नमाला प्रभाकर भोयर नगराध्यक्ष मुल श्री.संजय बुटले, कार्यक्रमाचे स्वागतउत्सुक.श्री.अनिल डोंगरे जिल्हाध्यक्ष प.पु.शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना,श्री.भाऊराव ठाकरे जिल्हाअध्यक्ष गडचिरोली,श्री.लक्ष्मीकांत धानोरकर जिल्हाउपाध्यक्ष,,श्री.पंडित काळे जिल्हाकोषाध्यक्ष,श्री.बालाजी बोरकुटे जिल्हा संघटक, श्री अविनाश राऊत श्री.सूरज जिभकाटे. श्री.दिगांबर वासेकर, श्री.महादेव मांडवकर.श्री दीपक ठाकरे मुल तालुका अध्यक्ष.हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात वीर जवानांना श्रद्धांजली वाहून तसेच शेषराव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन,मालार्पण करून झाली.संघटनेचे जिल्हाध्यक्ष व कार्यक्रमाचे स्वागतउत्सुक श्री.अनिल डोंगरे यांनी आपल्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्यात संगटनेच्या माध्यमातून व्यसन मुक्तीवर मेळावे घेत असताना मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष मोलाचे सहकार्य असून प्रत्येक मेळाव्याच्या कार्यक्रमात ते हेलिकॉप्टर ने येऊन कार्यक्रमाची शान वाढवीत असतात असे ते बोलले. कार्यक्रमाचे उदघाटक मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आपल्या उदघाटनीय भाषणात चंद्रपूर जिल्ह्यात २०१५पासून दारूबंदी केली असून त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याला या दारूबंदीचा फायदा झाला आहे तसेच जशी दारूबंदीची चळवळ उभारली तशी व्यसन मुक्तीची चळवळ उभारा अशे त्यांनी कार्यक्रमाअंतर्गत आव्हान केले.
तसेच शिरपूर,बुलठाण येथील प.पुज्य शेषराव महाराज व्यसन मुक्ती संस्थाला येणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या बजेटमधून संस्थानाच्या विकासाकरिता निधी मंजूर करून देणार अशी ग्वाही दिली व अश्या चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्धल टेकाडी गावाच्या विकासाकरिता 1 कोटी 50 लाख रुपये मंजूर करून देणार असे ते बोलले.तसेच प.पु.शेषराव महाराज यांचे उत्तराधिकारी श्री.संतोष महाराज हे महाराष्ट्रातिल कानाकोपऱ्यात जाऊन व्यसनमुक्त समाज घडवण्याचा प्रयत्न करत असून ना ते आमदार खासदार होण्याकरिता हे कार्य करीत आहे,असे त्यांनी त्यांच्या कार्याचे आपल्या मार्गदर्शनातून कौतुक केल.
तसेच इतर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले .कार्यक्रमाचा शेवट प.पूज्य शेषराव महाराज यांचे उत्तराधिकारी प.पूज्य संतोष महाराज यांचे व्यसन मुक्तीवर प्रवचन व संकल्पाने झाला या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री केतन जुनगरे यांनी केले.कार्यक्रमच्या यशस्वितेकरिता प.पूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना टेकाडीचे श्री. दौलत शेंडे श्री.गणपत जरते.श्री.सतीश चोधरी .श्री.मनोहर गणवीर.श्री.वामन गणवीर.श्री.शंकर भोयर श्री. बंडू गोहणे. तसेच मुल तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व संघटनेचे इतर पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने महिला ,पुरुष उपस्थित होते.