विविध क्षेत्रातील ३० व्यक्तींचा उल्लेखनीय कार्याबद्दल होणार गौरव
जुन्नर /आनंद कांबळे
शिवजयंतीच्या औचित्याने शिवजन्मभूमीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तीस व्यक्ती व संस्थांना शिवनेरभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवनेरभूषण पुरस्कार १९ फेब्रुवारीला ओझर (ता. जुन्नर) येथे प्रदान करणार असल्याची माहिती आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवजयंतीनिमित्त शिवनेरीवरील शासकीय सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, शिक्षण मंत्री विनोद तावडे ,ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे ,जलसंपदा मंत्री विजय शिवतारे ,सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे,खासदार शिवाजीराव आढळराव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे . त्यानंतर ओझर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केंद्र शासनाच्या भारतमाता रस्ते जोडणी योजनेच्या अंतर्गत राज्यातील अष्टविनायक क्षेत्रांच्या 10 किमी परिघातील रस्ते दुपदरी करण्याच्या २३० कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. ओझर येथे होणाऱ्या सभेत शिवनेरभुषण पुरस्कारांचे वितरण होणार आहे. मानचिन्ह व पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
शिवनेर भूषण पुरस्काराचे मानकरी
१. वै. हभप. कोंडाजीबाबा डेरे
२. वै. हभप. सहादूबाबा वायकर
३. वै. हभप. रामदासबाबा मनसुख
४. वै. महंत मोहनानंद गिरी महाराज
५. कै. आप्पासाहेब गेनूजी शिंदे
६. कै. गोविंद मोगाजी गारे
७. कै. रावसाहेब अनाजी बुट्टे
८. कै. विठाबाई नारायणगावकर
९. कै. बापूसाहेब लामखेडे
१०. हभप. सुदाम महाराज बनकर
११. श्री. बाळासाहेब सिताराम औटी
१२. श्री. संतोष भास्कर निंबाळकर
१३. समर्थ रूरल इन्स्टिट्यूट (शेळके बंधू)
१४. प्रा. दत्तात्रय सदाशिव काकडे
१५. श्री. विकास दांगट
१६. श्री. किशोर गेनभाऊ दांगट
१७. श्री. राहुल बनकर
१८. श्री. जयवंत डोके
१९. श्री. मंगेश घोडेकर
२०. श्री. राजीव विष्णू औटी
२१. श्री. आदिनाथ ज्ञानेश्वर चव्हाण
२२. श्री. रविंद्र रामचंद्र पाटे सर
२३. श्री. उदय सखाराम निरगुडकर
२४. ओझर गणपती देवस्थान ट्रस्ट (अध्यक्ष व सर्व विश्वस्त)
२५. लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट (अध्यक्ष व सर्व विश्वस्त)
२६. वडज देवस्थान ट्रस्ट (अध्यक्ष व सर्व विश्वस्त)
२७. ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट (अध्यक्ष व सर्व विश्वस्त)
२८. श्री. नितीन वामन सोनवणे
२९. श्री. विश्वासराव ढोबळे
३०. श्री. रामनाथ मेहेर सर