जुन्नर /आनंद कांबळे
शिवजयंतीच्या कार्यक्रमात राजकारण करू नये , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ओझर येथे होणाऱ्या सभेच्या ठीकानी कोणताही बदल होणार नाही असे प्रतिपादन आमदार शरद सोनवणे यांनी केले.जुन्नर येथे शिवजयंतीच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती देताना ते बोलत होते. केंद्र शासनाच्या भारतमाता रस्ते जोडणी योजनेच्या अंतर्गत राज्यातील अष्टविनायक क्षेत्रांच्या 10 किमी परिघातील रस्ते दुपदरी करण्याची कामे सध्या सुरु आहेत त्याचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात यावे यासाठी नोव्हेंबर महिन्यापासून पाठपुरावा सुरू होता. परंतु शिवजयंतीच्या कार्यक्रमाला येणार आहे त्याचवेळी अष्टविनायक क्षेत्रांच्या रस्त्याच्या कामांचा शुभारंभ करण्यात यावा अशा मुख्यमंत्र्यांच्या सूचना होत्या. अष्टविनायक क्षेत्रांच्या रस्त्याच्या कामांसाठी जुन्नर तालुक्यासाठी 230 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.तसेच ब वर्ग पर्यटन क्षेत्र असलेल्या ओझर व लेण्याद्री देवस्तान क्षेत्र विकासासाठी प्रत्येकी 25 लाख रुपये निधी देण्याचे मुख्यमंत्र्याकडे प्रस्तावित आहे.तालुक्याच्या विकासासाठीच हा निधी उपलब्ध होणार आहे,आशा वेळी संधीचे सोने करायचे का माती करायची याचा विचार ओझर येथे सभा नको याची मागणी करणाऱ्या विरोधकांनी करावा .शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शासकीय बैठकीत सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.त्यावेळी मुख्यमंत्र्याच्या सभा ओझर येथे घेण्यात येणार याबाबत सर्वांना अवगत केले होते,त्यावेळी कोणीही विरोध केला नव्हता. शिवजयंती कोण्या एका पक्षाची नाही.यात सर्वांनी सहभागी व्हावे,आमच्याकडुन याबाबत कोणत्याही प्रकारचे राजकारण केले जात नाही असेही आमदार शरद सोनवणे यांनी सांगितले. शछत्रपती शिवराय व शिवभुमीचा सन्मान करण्यासाठी मुख्यमंत्री येत आहेत. आमदार शरद सोनवणे यांचा प्रयत्न आहे. म्हणून अष्टविनायक कार्यक्रमात कोणताही बदल होणार नाही. असे प्रतिपादन आमदार शरद सोनवणे यांनी केले. जुन्नरमध्ये दिनांक 19 रोजी किल्ले शिवनेरी येथे साजरा होणाऱ्या शिवजयंती उत्सवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव ,सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, शिक्षण मंत्री विनोद तावडे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, आदी मान्यवर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.किल्ले शिवनेरीवरील सोहळा सँप्पन झाल्यावर श्री क्षेत्र ओझर येथे या सर्व मान्यवरांची उपस्थिती मध्ये जाहीर सभा व शिवनेरी भूषण पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे .शिवजयंतीच्या औचित्याने किल्ले शिवनेरी येथे येणाऱ्या राज्यभरातील शिवप्रेमी करिता विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध शासकीय विभागांना यावेळी सूचना देण्यात आल्या. शिवजयंती सोहळ्यासाठी मुख्य शासकीय कार्यक्रमात जागेअभावी,तसेच सुरक्षेसाठी शिवप्रेमीना प्रवेशपत्र असल्यावरच गडावर सोडण्यात येते.परिणामी पायथ्याशी मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी गडावर जाण्यासाठी तिष्ठत असतात ही गैरसोय टाळण्यासाठी यावेळी शिवनेरीवरील शिवजयंती सोहळ्याचे तीन ठिकाणी थेट प्रक्षेपण करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.