कौलारु घरांची पडझड
चंद्रपूर / प्रतिनिधी
पावसाला सुरुवात होवुन अचानक गारपीट सुरु झाली, परिसरातील मौशी, ढोरपा, ईरव्हा, टेकरी,बालापुर, पाहार्णी, विलम,म्हसली, तेली मेंढा, देवटेक, चिकमारा, कालेता, नान्होरी अशा अनेक गावातील मजुर कोणी रस्त्यात तर कुणी शेतात सापडल्याने अनेकांना प्राथमिक आरोग्य केंद्र मौशी येथे उपचारास पाठवण्यात आले. गारपिटीसोबत वादळी पावुस असल्यामुळे अनेकांची घरे उध्वस्त झाली. अनेक पक्षी मृत्यु मुखी पडले. ईतर जिवीत हानी जरी झाली नसली तरी शेतातील गहु, चना, मुंग, जवस, तुळी, जमीनदोस्त झाले असुन यासारख्या रबी पिकाची शंभर टक्केनुसकान झाली आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. अनेकांना रात्र जागुन काढावी लागली. आता शासनाकडुन चौकशी होवुन भरपाई कशी मीळेल या प्रयत्नात शेतकरी शेतमजुर असुन संबंधित तलाठी यांनी प्रत्यक्ष पहाणी केली आहे.