Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी २४, २०१९

देशाच्या प्रगतीत खादी व ग्रामोद्योगाचे मोठे योगदान




– ना. हंसराज अहिर
खादी व ग्रामोद्योग राज्यस्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन
चंद्रपूर दि. 24 फेब्रुवारी : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या संकल्पनेतून सुरू झालेले खादी व ग्रामोद्योगाचे कार्य अतिशय महत्वाचे असून, या चळवळीचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे,असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहिर यांनी आज केले. ते महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामउद्योग मंडळातर्फे आयोजित खादी व ग्रामोद्योग राज्यस्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

स्थानिक न्यु इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रिंडागणात आयोजित या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नानाभाऊ शामकुळे हे होते. तर प्रमुख अतिथी महापौर श्रीमती अंजलीताई घोटेकर, उपमहापौर अनील फुलझेले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, मंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकरी बिपीन जगताप, सहा. मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार डांगर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पुढे ना. हंसराज अहिर यांनी सांगितले की, देशात आणि राज्यात खादी व ग्रामोद्योग विभाग चांगले कार्य करित असून त्या अंतर्गत मातीकला, मधुमक्षिकापालन, सोलर चरख्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीतीचे कार्य करत आहे. या विभागाने खादी व ग्रामद्योग क्षेत्राच्या विकासासाठी आणखी जोमान कार्य करावे आणि त्यासाठी लागणारी सर्वोतोपरी मदत करण्यास तयार असल्याची ग्वाही यावेळी ना. अहिर यांनी दिली. तसेच चंद्रपूरकर नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देवून ग्रामीण कारगिरांना प्रोत्साहन देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या प्रसंगी बोलतांना महापौर श्रीमती घोटेकर यांनीही, महात्मा गांधीजींची ग्रामस्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी अशा प्रदर्शनाची गरज असून नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार डांगर यांनी तर संचालन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी अमरावती प्रदीप चेचरे यांनी केले.

दिनांक 23 ते 27 फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये खादी कापड, रेडिमेड गारमेंट, बांबु वुडन क्राप्ट, मध, हर्बल प्रोडक्ट, मसाले, हळद, पापड, आर्ट ज्वेलरी, खाद्य पदार्थ इत्यादी 60 स्टॉल विविध जिल्हयांमधून सहभागी झाले आहेत. तसेच सोलर चरखा व मधुमक्षिका पालन उद्योगाचे प्रात्यक्षिकसुध्दा याठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी चंद्रपूर झेड. सी. आत्राम यांच्यासह खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबई व जिल्हा कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.