Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी २३, २०१९

धानाला पाचशे रुपये बोनस देण्यात येईल


 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Ø  पाचशे हेक्टर पर्यंतच्या तलावाची लीज माफ
Ø  भंडारा-गोंदिया महामार्ग पदरी करणार - नितीन गडकरी
Ø  518 कोटीच्या विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण


भंडारा, - भंडारा गोंदिया हा प्रामुख्याने धान उत्पादन करणारा जिल्हा आहे. शासनाने धानाला दरवर्षी दोनशे रुपये बोनस दिला आहे. बोनस वाढवून द्यावा ही शेतकऱ्यांची मागणी होती. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार धानाला पाचशे रुपये बोनस देण्यात येईल,अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. साकोली येथे आयोजित विविध विकास कामाच्या भूमीपूजन व लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. एक हजार कोटी रुपये खर्च करून भंडारा गोंदिया राष्ट्रीय महामार्ग सहा पदरी करण्यात येणार असल्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात केली.
साकोली येथे आज जिल्ह्यातील 518.64 कोटी रुपये किमतीच्या विविध विकास कामाचे भूमीपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, आमदार डॉ. परिणय फुके, राजेश काशिवार, चरण वाघमारे, रामचंद्र अवसरे, विजय रहांगडाले, संजय पुराम, म्हाडाचे अध्यक्ष तारिक कुरेशी, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू नगराध्यक्ष धनवंता राऊत, सुनील मेंढे, प्रदीप पडोळे उपस्थित होते.
महाराष्ट्र बदलत आहे, विदर्भ बदलत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, विदर्भाच्या इतिहासात अभुतपुर्व असा निधी आपल्या सरकारने विदर्भाच्या विकासासाठी दिला. साडेचार वर्षात 50 हजार किलोमीटरच्या रस्त्यांचे काम सुरू आहे. सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. गोसेखुर्द प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासणार असून येत्या दीड वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गोसेखुर्द प्रकल्पाला निधी दिल्यामुळे आता या प्रकल्पातून 50 हजार हेक्टर सिंचन झाल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या साडेचार वर्षात शासनाने विविध योजनेच्या माध्यमातून लोकांच्या खात्यात 50 हजार कोटी रूपये जमा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वर्ग दोन च्या जमिनी वर्ग एक करण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतला असल्याचे ते म्हणाले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शासनाने शेतकऱ्यांकडून विविध शेतमालाची 8500 कोटी रुपयांची खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले.
भंडारा गोंदिया तलावांचा सुद्धा जिल्हा आहे. तलावांची लीज कमी करण्याची मागणी येथील मासेमारी संस्थेची होती. 500 हेक्टर क्षमता असणाऱ्या तलावासाठी आता लीज आकारली जाणार नाही. 500 ते 1000 हेक्टरसाठी सहाशे तर 1000 हेक्टरवरील तलावासाठी 900 रुपये लीज आकारली जाईल. तलावाचे कंत्राट केवळ मासेमारी संस्थानाच देण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.





ना. नितीन गडकरी


नागपूर - भंडारा राष्ट्रीय महामार्ग सहा पदरी करण्यासाठी आपल्या विभागाने मंजुरी दिली असून एक हजार कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येणाऱ्या महामार्गाचे काम तीन महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. भांडार जिल्ह्यात 4127 कोटी रुपयांची रस्त्यांची कामे करणार असे आपण म्हणालो होतो. त्यापैकी 2750 कोटींची कामे मंजूर झाली असून 1630कोटींची कामे प्रस्तावित आहेत असे ते म्हणाले. भंडारा बायपास 400 कोटी, भंडारा तुमसर रस्ता 250 कोटीला मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


लाखांदूर ब्रम्हपुरी रस्त्यावर पूल कम बंधारा कामाचे भूमीपूजन करण्यात आले असून या रस्त्यामुळे 24 किलोमीटर अंतर कमी होणार आहे. बंधाऱ्यामुळे शंभर गावांना सिंचनाची सोय उपलब्ध होणार असून चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा या चार जिल्ह्याचे दळणवळण सुकर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. भंडारा येथे बायो एव्हीएशन फ्युल हब निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यामुळे धानाच्या तणसापासून इथेनॉलची निर्मिती होऊन इंधनाला पर्याय मिळेल व शेतकऱ्यांना आर्थिक लाभ तसेच तरुणांच्या हाताला काम मिळेल असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी पीक पध्दतीत बदल करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
पालकमंत्री
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्याला एक हजार कोटींचे रस्ते दिले. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत 750 कोटींचे रस्ते जिल्ह्याला देण्यात आले. 4 लाख 61 हजार परिवाराने शासकीय योजनांचा लाभ घेतला. दीड लाख शेतकऱ्यांना वर्ग 2 ते वर्ग एक चा लाभ मिळाला. पीक विमा योजना, सर्वांसाठी घरे, कर्जमाफी, कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला. 73990 कुटुंबाला उज्जवला गॅस कनेक्शन दिले. दीड लाख लोकांना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा लाभ दिला जाणार आहे. 99 हजार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसन योजनेचा लाभ मिळणार आहे. भंडारा येथील महिला रुग्णालयाला 50 कोटी देण्यात आले. गोसेखुर्दचे काम पूर्ण होणार आहे. पालकमंत्री पांदण योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
पुढील सहा महिन्यात भंडारा जिल्ह्याचा अनुशेष भरून काढला जाईल असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.


स्वच्छ भारत अभियानात देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात काम झाले आहे. गेल्या साडेचार वर्षात राज्यात लक्षणीय काम झसले आहे. वैनगंगा नदीवर होणाऱ्या ब्रिज कमी बंधाऱ्याचा लाभ तीन जिल्ह्याला होणार आहे. गोसेखुर्दच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. या कामामुळे सिंचन वाढले आहे. धानाला 500 रुपये बोनस जाहीर करावा. देव्हाडा साखर कारखान्याची गाळप क्षमता दुप्पट करावी. तलावांची लीज माफ करावी. जतीराम बर्वे यांच्या स्मारकासाठी 2 एकर जागा नागपुरात द्यावी. शेतकऱ्यांना कमीत कमी बारा ते चौदा तास वीज धवी अशी मागणी बाळा काशीवार यांनी केली.

.

आज भूमीपूजन व लोकार्पण करण्यात आलेल्या भंडारा जिल्हयातील विविध विकास कामांची माहिती


लाखांदूर तालुक्यातील सिंदपूरी, सिवनाळा, मोहरणा, गवराळा, चप्राळ रस्ता रुंदीकरण व सुधारणा कामाचे भूमिपूजन - किंमत 15 कोटी 75 लाख रुपये. लाखांदूर तालुक्यातील किटाळी, मासळ, विरली रस्ता सुधारणा कामांचे भूमिपूजन – किंमत 2 कोटी 65 लाख रुपये. भंडारा जिल्हयातील अडयाळ, माडगी, लाखोरी, सालेभाटा, मुंडीपार, किन्ही, एकोडी, वडेगाव, आतेगाव, बिरसी, तिरोडा, इंदोरा ते खैरलांजी राज्य सिमा पर्यंतच्या रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन –किंमत 1 कोटी 15 लाख 92 हजार रुपये
भंडारा जिल्हयातील जांब, आंधळगाव, मोहाडी, मुंडरी, खडकी, खेडेपार, लाखनी, पेंढरी, पालांदूर ते राज्य महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन – किंमत 1 कोटी 99 लाख 8 हजार. साकोली येथे 3 कोटी 23 लाख 23 हजार रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या तहसिल कार्यालय इमारतीचे लोकार्पण. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडेगाव तालुका लाखनी येथे 4 कोटी 99 लाख 23 हजार रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या कार्यशाळा व प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण.


मोहाडी येथे 12 कोटी 63 लाख 20 हजार खर्चाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन. तुमसर येथे 13 कोटी 3 लाख 74 हजार खर्चाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन. मोहाडी तालुक्यातील जांब, मोहाडी, रोहा, मुंडरी, खडकी रस्तयावर वैनगंगा नदीवर 40 कोटी खर्च करुन बांधण्यात येणाऱ्या मोठया पुलाचे व बंधाऱ्याचे भूमिपूजन. वैनगंगा नदीवर मौजा इटान तालुका लाखांदूर व मौजा कोलारी ता. ब्रम्हपूरी जिल्हा चंद्रपूरला जोडणाऱ्या मोठया पुलाचे व पोच मार्गाचे बांधकाम. किंमत 1 कोटी 37 लाख 37 हजार रुपये. इत्यादी कामांचे आज भूमीपूजन करण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.