चिटकी फुटकी, गोविंदपुर, लोनखैरी, नवेगाव या गावात बस सुरु
प्रशांत गेडाम/सिंदेवाही
श्रमिक एल्गार च्या वतीने सिंदेवाही तालुक्यातील 23 गावात बस सुरु करण्याची मागणी मागील दीड वर्षापासुन करण्यात येत आहे. यासाठी संघटनेने अनेक आंदोलने केली. मात्र प्रशासन रोड अरूंद, गुरे ढोरे, झाडाच्या फांद्या, लोंबकळत असलेले विद्युत तार अशी कारणे सांगुन बस शुरु न करण्याचा चंगच बांधला होता. तसा अहवाल जिल्हाधिकारी यांना एस.टी. महामंडळने दिला होता. यामुळे 23 गावातील नागरीक संतप्त होवुन दि. 27/2/2019 ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बस सुरु होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात शुरू केले.
आपला देश पाकिस्थानात विमाने नेत आहे मात्र स्वातंत्र्याचे सत्तर वर्षानंतरही आपल्या आयाबहीनी बसची गावात वाट पाहत आहे. हे शासनाचे अपयश आहे असे मत अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी आंदोलनातुन व्यक्त केले.
गावात साधी बस नाही बसस्टँड कोट्यावधीचे बांधल्या जात आहे. रस्ते , नाली साभागृह बांधल्या जात आहे. बांधकामातुन कमीशन मिळतो मात्र बस शुरु केला तर काहीच मिळत नाही यामुळे याकडे कुनीच लक्ष देत नाही अशी खंतही व्यक्त केली.
श्रमिक एल्गारच्या बेमुदत धरने आंदोलनाची दखल घेत अप्पर जिल्हाधिकारी कलंत्रे यांनी एस.टी. महामंडळाचे अधिकारी यांना बोलवुन श्रमिक एल्गारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा घडवुन 23 गावात बस सुरु करण्याचा मार्ग काढला. व शुरवात करण्यासाठी दि. 28/2/2019 ला चिटकी, फुटकी, गोविंदपुर, लोनखैरी, नवेगाव यागावात बस सुरु करण्यात येनार असल्याचे सांगितले. बाकी गावात वेळापत्रक तयार करुन बस शुरू करण्याची ग्वाही दिली.
विषेश म्हणजे एस.टी महामंडळाचे अधिकारी यांनी जिल्हधिकारी यांना खोटा अहवाल दिल्याने अॅड. गोस्वामी यांनी त्यांचे विरोधात रामनगर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्याची भुमिका घेतलेली होती यामुळे चांगलीच खळबळ उळाली.
आंदोलनात चिटकी, नवेगावचक, सरांडी, खांडाला, पिपरहेटी, नैनपुर, पांगडी, वाकल, गावतील नागरीक सहभागी होते. आंदोलनात श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार , महासचिव घनशाम मेश्राम, संगीता गेडाम, रवि नैताम, शांताराम आदे यांनी मार्गदर्शन केले तर कुसुम कोवे, वंदना मांदाडे, मिनाक्षी नागदेवते, इत्यादीनी मनोगत व्यक्त केले.