Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी २८, २०१९

राज्याचे नवे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल



मुंबई, दि. 28 : राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून सुबोधकुमार जयस्वाल यांनी आज मावळते पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्याकडून पोलीस महासंचालनालयात झालेल्या समारंभात कार्यभार स्वीकारला. श्री. जयस्वाल हे भारतीय पोलीस सेवेच्या 1985च्या तुकडीचे अधिकारी असून ते या आधी मुंबई पोलीस आयुक्त पदावर कार्यरत होते. यावेळी राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त श्रीमती रश्मी शुक्ला, अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) परमवीर सिंह, अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) डॉ. प्रज्ञा सरवदे, विशेष पोलीस महानिरिक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर, विशेष पोलीस महानिरिक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलिंद भारंबे तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.