नागपूर / अरुण कराळे:
श्रीसंत दौलत महाराज संगमेश्वर शिवमंदिर सामाजिक संस्था मुक्तापूर पेठ (जलालखेडा) येथे माघ् पौर्णिमा उत्साहाच्या पावन पर्वावर सोमवार १८ फेब्रुवारी ते मंगळवार १९फेब्रुवारी रोजी मातंग समाजांचा सामुहिक विवाह सोहळा, मातंग समाज मेळावा व सामाजिक सत्कार सोहळा डाॅ . आनंद खडसे यांच्या अध्यक्षतेत , माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार कृपाल तुमाने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी नरखेड पंचायत समीतीचे सभापती राजेंद्र हरणे,बंडोपंत उमरकर, उकेशजी चव्हाण, मधुसूदन गवई, द्वारकाबाई नाखले , लहानुजी इंगळे, महादेवराव जाधव,साहेबराव वानखेड़े, शंकरराव वानखेडे, डाॅ .पुरूषोत्तम सनेसर, संजय कठाळे, राजीव अहीव, अरविंद डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते .
सोमवार १८ फेब्रुवारी रोजी भजन संध्या, किर्तन व सुगम संगीताचा कार्यक्रम घेण्यात आला .प्रास्ताविक नत्थुजी अडागळे ,सूत्रसंचालन संजय ठोसर तर आभार प्रदर्शन दिलीप ठाकरे यांनी केले .या महोत्सवात महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील हजारों स्त्री व पुरुष समाज बांधव उपस्थित होते. सामुहीक विवाह सोहळ्यामुळे लग्नासोहळ्यावरील होणाऱ्या खर्चात मोठी बचत होत असल्याने समाज बांधवांनी आपल्या मुला - मुलींची लग्ने सामुहिक विवाह सोहळ्यात केली पाहिजेत अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली. महाप्रसादाचा लाभ चार हजारांपेक्षा पेक्षा जास्त भाविकांनी घेतला.