Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी २२, २०१९

द्रुगधामना येथे शिवाजी स्मारकाचे भुमीपूजन

नागपूर / अरूण कराळे:

नागपूर तालुक्यातील द्रुगधामना येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचीत्य साधुन गावाच्या मुख्य चौकाचे शिवाजी महाराज चौक असे नामकरण करुन शिवस्मारकाचे भुमीपूजन करण्यात आले . स्मारकाच्या जागेचे सौंदर्यीकरण पूर्ण झाल्यावर महाराजांच्या सिंहासनारुढ पुतळ्याची स्थापना करण्यात येईल असे शिवसेनेचे विभागप्रमुख नरेश मसराम व उपविभाग प्रमुख कैलाश मालवे यांनी सांगीतले.

छत्रपतीच्या जयघोषात स्मारकाच्या जागेवर भुमीपूजन करुन नरेश मसराम कैलाश मालवे ,सरपंच दुर्गा किरनाके ,उपसरपंच सुधाकर राऊत , माजी सरपंच बंडुजी गजभिये यांनी कुदळ मारुन कामाला सुरुवात करुन दिली .शिवस्मारकाच्या निर्मीतीचे काम शिवसेनेने मार्गी लावल्याचा आनंद द्रुगधामना वासीयांच्या चेह-यावर झळकतांना दिसत होता . उपस्थितांनी शिवसेनेचे आभार मानले .तत्पुर्वी पुलवामा येथील सैनीकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवीत हल्ल्यात विरमरण पत्करलेल्या ४४ विर सैनीकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी रोशन वगारे ,नरेश वरठी स्वप्नील नासरे , प्रफुल्ल बांडवे ,प्रविण वानखेडे ,जसवंत वगारे ,गजानन वानखेडे ,हर्षल राऊत , प्रज्वल राऊत ,सतिश ऊरकुडकर , कैलाश गायकवाड ,अंकुश वाघपराजन ,आशिष शिंदे ,विशाल वंजारी ,धनराज उदापूरे व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.