Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी २२, २०१९

जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी दुमदुमली वाडी

वाडी ( नागपूर )/अरूण कराळे:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९२ व्या जयंती निमीत्य शोभायात्रा व महाप्रसाद आयोजीत करण्यात आला होता .
द ग्रेट शिवराजे फाउंडेशनतर्फे श्री छत्रपत्री शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव निमीत्य भव्य शोभायात्रा काढण्यात आली . सर्वप्रथम आदर्शवाडीतील श्री छत्रपति शिवाजी महाराज स्मारक येथे शिवराजे ढोल ताशा पथक वाडी यांनी मानवंदना देऊन महाआरती करण्यात आली . 

सायंकाळी खासदार कृपाल तुमाने यांनी शोभायात्रेला भगवी झेंडी दाखविली .कार्यक्रमाचे आयोजन द ग्रेट शिवराजे फाउंडेशनचे संथापक लोकेश जगताप , अध्यक्ष शुभम डवरे , सचिव प्रसाद गलांडे ,महेश चौधरी,महेश रागीट ,मनोज नासरे ,भूषण खवशी,शिवपाल भिवनकर, योगेश चरडे, निखिल पारिसे, प्रवीण गडमले आदीसह हजारों शिवभक्त उपस्थित होते .


राष्ट्रवादी काँग्रेस 
  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सामाजीक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, नगरसेवक तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्याम मंडपे ,योगेश चरडे,ईश्वर चव्हाण,दत्ताजी वानखेडे, राजू खोब्रागडे विजय नंदागवळी, दिनेश उइके,भरत फेन्डर आदींनी शिवजयंती साजरी केली .

भीम सेना 
वाडीतील भिमसेनेच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली . यावेळी भीमसेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीधर सालवे, राष्ट्रीय महासचिव व उत्तर प्रदेश प्रभारी अनिल पाटिल, राष्ट्रीय महिला संघटक अर्चना उके,ग्रामीण जिल्हाध्यक्ष रोशन सोमकुंवर, सिद्धार्थ खोब्रागडे, निकुंज मेश्राम नितिन बागड़े, रितेश सोमकुंवर, अमित कोल्हे, शुद्धोधन सोनवाने प्रामुख्याने उपस्थित होते . 

नागपूर तालूका पत्रकार संघ 
नागपूर तालूका पत्रकार संघाच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आले .यावेळी तालुक्याचे अध्यक्ष सुरेश फलके , कार्याध्यक्ष अजय तायवाडे , महासचिव अरुण कराळे , प्रसिद्धी प्रमुख नटवर अबोटी , सौरभ पाटील , गजानन तुमडाम ,सविता पाटील, अंकीता कराळे,उषा फलके,माधुरी तायवाडे,गायत्री अबोटी,कविता तुमडाम प्रामुख्याने उपस्थित होते .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.