Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी १०, २०१९

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात गुणवत्ता मंडळाचा २५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

चंद्रपूर/प्रतिनिधी:

​ दि. ८ फेब्रुवारी २०१९ रोजी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात गुणवत्ता मंडळाचा २५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनानिमीत्य आयोजीत समारोपीय व बक्षिस वितरण कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करतांना श्री. जयंत बोबडे मुख्य अभियंता यांनी गुणवत्ता मंडळाचा विकास व चळवळ पुढे नेण्याकरीता सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले. गुणवत्ता मंडळाच्या माध्यमातुन समस्यांचे निराकरण केल्यामुळे विद्युत केंद्राची प्रगती झाली असुन कर्मचा-याचा कामाचा दर्जा वाढून उत्पदनात वाढ झाली असल्याचे सांगीतले तसेच व्यवस्थानामार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

गुणवत्ता मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन सोहळयाचे अध्यक्षपद मुख्य अभियंता श्री जंयत बोबडे यांनी भुषविले तर प्रमुख वक्ता म्हणुन डॉ. सुरेंद्र गोळे प्रिंसीपल, सेंट विंसेंट पलोटी अभियांत्रीकी महाविद्यालय,नागपूर आणि मानव संसाधन व्यवस्थापनचे प्रसिध्द विचारवंत तसेच उपमुख्य अभियंता सर्वश्री श्री.अनिल आष्टिकऱ, श्री राजेश राजगडकर , श्री राजेशकुमार ओस्वाल व श्रीमती विजया बोरकर मंचावर उपस्थित होते.

श्री. दिलीप धकाते यांनी आपल्या शुभेछा संदेशामधे गुणवत्ता मंडळामुळे कंपनीला होणारा फायदा यावर विषेश भर दिला.डॉ . सुरेंद्र गोळे यांनी आपल्या भाषणातुन व्यवस्थापन कौशल्य गुणवत्तेवर कसे आधारीत असु शकते यावर आपल्या भारदस्त शैलीत प्रकाश टाकला.

त्यांनी गुणवत्ता कोणत्या परिस्थीतीत वाढायला पाहीजे व स्पर्धा कोणाशी, कधी करायची याचं शास्रोक्तपध्दतीने विवेचन करून सर्वांना कठीण प्रसंगी त्यातून बाहेर पडण्याचा यशस्वी मंत्र दिला. रामायण, महाभारत व संस्कृत श्लोकांचा आधार घेत स्पर्धा, गुणवत्ता व स्वतःला ओळखण्याचा आणि अंतर्गत असलेल्या क्षमतेचा नवा संदेश दिला.
या कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलन करून करण्यात आली़ तसेच पाहुण्याचे स्वागत स्वागतगित सादर करून करण्यात आले. श्री राजेंद्र पोइनकर व चमुनी स्वरचीत स्वागतगित सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. तद्‌नंतर प्रमुख अतिथीचे सत्कार स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आले.

गुणवत्ता मंडळ स्पर्धेचे परिक्षक म्हणुन कार्यकारी अभियंता श्री जयप्रकाश बोवाडे, सौ सविता फुलझेले व कनिष्ठ अभियंता श्री मुरलीधर गोहने यांनी काम पाहीले. या वर्धापन दिनानिमीत्य केस स्डडी सादरीकरण, कविता, घोषवाक्य़, निबंध व प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. श्री.सुरेंद्र निशानराव कार्यकारी अभियंता व गुणवत्ता मंडळ मुख्य समन्वयक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन केले.

कार्यक्रमाचे संचलन पल्लवी दुर्गे व स्नेहल पाटील यांनी केले तर आभार प्रर्दशन सौ. प्रीती येरेवार व बक्षिस वितरण संचलन सौ श्वेता दासरवार यांनी केले. कार्यक्रमाला चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंदातील सर्व अधिक्षक अभियंते़, कार्यकारी अभियंते, कर्मचारी व गुणवत्ता मंडळाचे सदस्य मोठया संख्येने प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अधीक्षक अभियंते सर्वश्री अनिल पुनसे, सुहास जाधव, पुरुषोत्तम उपासे, सुनील कुलकर्णी, कार्यकारी अभियंता श्री जयप्रकाश बोवाडे, श्री शालीक खडतकर, सौ भेंडेकर व अतिरिक्त कार्यकारी अभियंता हेमंत ढोले तसेच श्री विष्णु पगारे, श्री दिगांबर इंगऴे, श्री सतिश पाटील, श्री देवराव कोंडेकर, श्री दिलीप कातकऱ, कु. शितल मेश्राम, कु. रोशनी ठाकरे व गुणवत्ता मंडळाचे सदस्यांनी अथक परीश्रम घेतले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.