Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी १०, २०१९

आदिवासी महोत्सवाचा समारोप

नागपूर/प्रतिनिधी:

   जल, जमीन आणि जंगल यांचे रक्षण करण्याचे काम आदिवासी समाजाने कित्येक काळ केले. आदिवासी संस्कृती ही अतिशय समृद्ध अशी संस्कृती आहे. या समाजाने स्वत:सह विविध संस्कृती जोपासण्याचे काम केले. आदिवासी संस्कृती व परंपरांनी नागपूर शहराला आकार व अस्तित्व प्रदान करण्याचे महत्वाचे कार्य केले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

परंपरागत आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित आदिवासी महोत्सवाचा शनिवारी (ता. ९) समारोप झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार फग्गनसिंग कुलस्ते, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार डॉ. ‍परिणय फुके, महोत्सवाच्या आयोजक राष्ट्रीय जनजाति आयोगाच्या सदस्या माया इवनाते, सत्ता पक्षनेते संदीप जोशी, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, नगरसेवक संजय बंगाले, जगदीश ग्वालबंशी, संदीप जाधव, अमर बागडे, नगरसेविका रूतिका मसराम, गोंड राजमाता राजश्रीदेवी उईके,‍ नवनीतसिंग तुली, नंदलाल पंजवानी, संजय गिरगावकर, किशन गावंडे, शाम धुर्वे आदी उपस्थित होते. 


पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आदिवासी संस्कृती ही विशाल संस्कृती आहे. गोंड राजे बख्त बुलंदशाह यांनी संपूर्ण भागात या संस्कृतीची परंपरा पोहोचविण्याचे काम केले. आदिवासी परंपरांनी महाराष्ट्र राज्य समृद्ध आहे. ही संस्कृती जीवंत राहावी, ती पुढील अनेक पिढयांसाठ प्रेरणादायी ठरावी यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे. आदिवासी महोत्सवाच्या माध्यमातून संस्कृती संवर्धनासह ती जतन करण्याचे महत्वाचे कार्य केले जात असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. 

सांस्कृतिक मुल्यांचे जतन आवश्यक : ना.नितीन गडकरी 
शहर, देश अथवा राज्याच्या विकासात उत्तम रस्ते, वाहतुकीची सुविधा, रोजगार या बाबी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. मात्र या सोबतच सांस्कृतिक मुल्य वाढविणे व त्यांचे जतन होणेही आवश्यक आहे. सांस्कृतिक मुल्यांनीच व्यक्तीचा विकास होतो, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. 

नागपूर शहर ‍वसविणारे गोंड राजे बख्त बुलंदशाह यांचा पुतळा विधानभवनापुढे स्थापित करण्यास पुढाकार घेऊन तत्त्कालीन महापौर माया इवनाते यांनी आदिवासी संस्कृतीच्या संवर्धनासाठी महत्वाचे पाऊल उचलले. तो वसा कायम ठेवित आदिवासी महोत्वाच्या माध्यमातून नव्या पिढीपुढे संस्कृतीच्या अभ्यासाचे द्वारे खुले करण्यात महत्वाची भूमिका बजाविल्याबददल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माया इवनाते यांचे अभिनंदन केले. 

अनेकांना अवगतही नसलेला गोंड राजे बख्त बुलंदशाह यांचा इतिहास नाटकामार्फत लोकांपर्यंत पोहोचविणा-या ‘नागपुर का राजा’ नाटकाच्या संकल्पनेचीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी स्तुती केली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय जनजाति आयोगाच्या सदस्या व महोत्सवाच्या आयोजक माया इवनाते यांनी केले. संचालन नगरसेवक संदीप जाधव यांन केले. यावेळी मोठया संख्येत आदिवासी समाजबांधव व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.