Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी १९, २०१९

७१ वीज चोरांच्या विरोधात महावितरण कडून गुन्हे दाखल

नागपुर/प्रतिनिधी:         


वीज चोरीला आळा घालण्यासाठी   महावितरणने नागपूर जिल्ह्यात उघडलेल्या धडक मोहिमेत मागील १० महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातवीज मीटर फेरफारच्या ८३७ घटना उघडकीस आल्या असून यातील २१ जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोबतच अनधिकृत वीज पुरवठा घेतल्या  प्रकरणात ५० वीज चोरांच्या विरोधात गुन्हे महावितरणकडून दाखल करण्यात आले आहेत.

एप्रिल-२०१८ ते जानेवारी २०१९ या १० महिन्याच्या कालावधीत नागपूर शहरात वीज मीटर छेडछाडीच्या ९८ घटना उघडकीस आल्या. यातील ६३ घटना काँग्रेस नगर विभागात तर ३५ घटना बुटीबोरी विभागात उघडकीस आल्या.काँग्रेस नगर विभागात वीज मीटरची छेडछाड करून महावितरणचा १८ लाख ११ हजार रुपयांचा महसूल बुडवला. तर बुटीबोरी विभागात ८ लाख ७७ हजार रुपयांचा महसूल बुडवला. दोन्ही विभागातून महावितरणला  २४ लाख रुपयांचा महसूल वीज देयकापोटी वसूल करण्यात यश आले आहे. ६ वीज ग्राहकांच्या विरोधात पोलिसांनी  गुन्हे  दाखल केले  आहे.
नागपूर ग्रामीण मध्ये मौदा विभाग सर्वाधिक २९३ घटना उघडकीस आल्या असून त्याखाली सावनेर विभागात २५२ घटना उघडकीस आल्या आहेत. उमरेड ७६ तर काटोल विभागात ११८ घटना उघडकीस आल्या. ग्रामीण भागात १ कोटी ५७ लाखाचा महसूल बुडवला. यातील १ कोटी २१ लाख रुपयांचा महसूल वसूल करण्यात महावितरणला यश आले असून १५ वीज ग्राहकांच्या विरोधात पोलिसांनी भारतीय विदुयत कायदा, कलम  १२६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अनधिकृत वीज वापराचे प्रमाण या कालावधीत कमी झाले आहे. यासाठी नागपूर शहारत ४९६ तर ग्रामीण भागात १०८५ वीज जोडण्याची तपासणी करण्यात आली. यात काँग्रेस नगर विभागात ७१ तर बुटीबोरी विभागात २० ठिकाणी अनधिकृत पणे वीज वापर होत असल्याचे निदर्शनास आले. काँग्रेस नगर विभागात वीज चोरांनी १ लाख १६८ युनिट्स ची वीज चोरी केल्याचे आढळून आले. वीज चोरांकडून ९ लाख ४७ हजार देयकापोटी वसूल करण्यात आले. नागपूर ग्रामीणमध्ये ७७ घटना उघडकीस आल्या. यात सर्वाधिक ४३ घटना सावनेर विभागात उघडकीस आल्या.येथे वीज चोरांनी १२ हजार १७ युनिट्सची वीज चोरी केल्याचे आढळून आले. महावितरणने १ लाख ७५ हजार वसूल केले.

आकडे टाकून वीज चोरी करणयाच्या नागपूर शहरात १५४ घटना उघडकीस आल्या. यासाठी  काँग्रेस नगर विभागात ७८८ वीज जोडण्यांची   तपासणी करण्यात आली. काँग्रेस नगर विभागात वीज चोरांनी २३ हजार १२० युनिट्सची वीज चोरी केली होती. ग्रामीण भागात २२१ प्रकरणात वीज चोरांनी २ लाख ८६ हजार २३० युनिट्सची वीज चोरी केली होती येथून वीज ग्राहकांकडून अनुक्रमे १ लाख २८ हजार आणि ९ लाख ६१ हजार रुपये वसूल करण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.