चंद्रपूर/प्रतिनिधी:
तरुणांमध्ये देशाप्रती आणि देशसेवेबद्दल आवड निर्माण व्हावी . आपल्या देशाप्रती आपले कर्तव्य काय आहे हे समजून घेण्यासाठी देशातल्या राष्ट्रीय पातळीवर आयोजन करण्यात आलेल्या तीन राष्ट्रीय सेवा शिबिरात जनता महाविद्यालय चंद्रपुर चा विद्यार्थी योगेश वसंतराव भलमे या विद्यार्थ्याने आपला सहभाग दर्शविला आहे.
पदवी अंतिम वर्षाला असलेला हा हरहुन्नरी विद्यार्थी आपल्या अंगातील कलागुणांनी स्वत:चे अस्तित्व सिद्ध करतोय. मूळ वणी तालुक्यातील सिंदोला या छोट्या गावातील हा युवक परिवर्तन मंचच्या राज्यस्तरावरच्या सेवा शिबिरात वर्धा येथे सहभागी झाला आणि तिथूनच या युवकाला एक दिशा मिळाली. त्यांनतर छत्तीसगढ येथील रायपूर येथे झालेल्या शिबिरात देश भरातून आलेल्या युवकांमध्ये त्याने सहभाग घेतला व महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. नंतर पंजाब मधील जालंधर येथे निवड झालेल्या पाच हजार युवकांमध्ये त्याचा समावेश होता आणि नुकतेच तो राजस्थान येथे जयपूर येथील राष्ट्रीय सेवा शिबीरात सहभागी होऊन परतला आहे.
नाटक अभिनय काव्यलेखन आणि नृत्याची आवड असणारा योगेश हा सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच या चनाद्रपुरातील प्रख्यात साहित्य संस्थेचा कार्यकर्ता आहे. कवी इरफान शेख यांच्या मार्गदर्शनात तो आपली काव्यप्रतिभा जोपासत आहे. जनता महाविद्यालयाचे प्राचार्य एस सुभाष यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉक्टर मिलिंद जांभुळकर यांचे सहकार्य आपल्याला लाभत असल्याचे योगेश भलमे यांनी सांगितले त्याच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे