Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी १०, २०१९

शिक्षकांच्या आयकर टीडीएस मधील घोळ दूर करण्याची मागणी

महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेत्तर सेनेची जि.प.
मुख्य कार्यकारी अधिकारीकडे तक्रार 
नागपूर /अरुण कराळे:
tds long form साठी इमेज परिणाम
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख यांचे वेतनातून दरमहा कपात करण्यात आलेल्या टीडीएस (अग्रीम आयकर) पंचायत समिती आहरण व संवितरण अधिकार यांनी योग्य प्रकारे आयकर विभागाकडे जमा न केल्यामुळे प्रचंड घोळ निर्माण झाला आहे.सदर टीडीएस घोटाळा गेल्या पाच वर्षातील असून नागपूर, कामठी, हिंगणा पंचायत समितीसह इतरही पंचायत समिती कार्यलयाचा समावेश आहे.

सदरच्या घोळामुळे अनेक शिक्षक व केंद्रप्रमुखांना आयकर विभागाद्वारे कलम १४३ ( १ )अंतर्गत नोटिसा धाडण्यात येत असून आयकर भरण्याचा सूचना दिल्या आहेत.नागपूर पंचायत समिती मधील सन २०१३ - १४ या आर्थिक वर्षातील चवथा त्रैमासिक २४ क्यू ऑनलाईन न केल्यामुळे जादा कपात केलेला आयकर परतावा मिळालेला नाही. याच वर्षात ५०ते ६० शिक्षकांची आयकर आकारणी चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे चवथा २४ क्यू ऑनलाईन केले नसल्याची माहिती आहे.पंचायत समिती कामठी मधील शिक्षकांना सन २०१५ -१६ मधील आयकर जमा करण्याच्या नोटीस येणे सुरू झाले आहे.

सदर प्रकार अत्यंत धक्कादायक असून याबाबत अनेकदा जिल्हा परिषद प्रशासनाकडे संघटनेकडून तक्रारी करण्यात येऊनही दखल घेण्यात येत नसल्याने पंचायत समीतीच्या कामात सुधारणा दिसून येत नाही.
प्रत्येक पंचायत समीतीकडे २५०ते ४५० शिक्षकांची आस्थापना आहे.फॉर्म नं १६ तयार करण्याची जबाबदारी कार्यालयाची असतांना जिल्हा परिषद शिक्षक स्वतःचे आयकर निर्धारण स्वतःच करून १६ नंबरचे फॉर्म सादर करीत असतात.
सादर केलेल्या फॉर्मची तपासणी सुदधा काही शिक्षकांना पंचायत समीती कार्यालयात बसवून केल्या जात असून जबाबदार कर्मचारी या कामाकडे कमालीचे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.काही पं .स .मध्ये तर या कामासाठी शिक्षकांकडून आर्थिक वर्गणी सुद्धा गोळा केल्या जाते.शिक्षकांच्या वेतनातून कपात केलेला अग्रीम आयकर प्रत्येक त्रैमासिक २४ क्यू भरण्यासाठी तज्ञ व्यक्ती पं .स .कार्यालयात नसल्याने सदरचे काम खाजगी व्यक्ती किंवा संस्थेमार्फत करण्यात येत असल्याने नक्की या सर्व घोटाळ्यास जबाबदार कोण असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेत्तर सेनेचे राज्य सरचिटणीस शरद भांडारकर यांनी केला आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाने या घोळाची तातडीने दखल घेऊन आयकर निर्धारण व आयकर विभागात टीडीएस ऑनलाईन भरणा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेत्तर सेनेचे शरद भांडारकर, संजय चामट, मनोज घोडके, अशोक डहाके, राजेंद्र डोरलीकर, किसमल माकडे, श्रीराम वाघे, संगीता अवसरे, ललिता रेवतकर, प्रदीप दुरगकर, दिपचंद पेनकांडे, श्रीराम वाघे, हरिश्चंद्र दहाघाणे, कल्पना दशोत्तर, राजेंद्र देशमुख, गुणवंत इखार, प्रवीण मेश्राम, वामन सोमकुवर, श्यामराव डोये, चंद्रकांत मासुरकर, मोरेश्वर तडसे, प्रकाश काकडे आदींनी केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.