रहाटणी जिल्हा परिषद शाळेतील बाजारात १५ हजारांच्यावर उलाढाल
पुसेसावळी (राजु पिसाळ) :
जिल्हा परिषद प्रथमिक शाळा रहाटणी (ता.खटाव) येथे बालबाजार भरला या बालबाजारात मुला- मुलींनी १५ हजार रुपयेची उलाढाल केली.यावेळी गावातील ग्रामस्थांना बरोबर रहाटणीतील पालक वर्ग, शिक्षक व गावातील ग्रामस्थांनी खरेदीचा आनंद घेतला.
या बाजाराला चांगला प्रतिसाद गावातील ग्रामस्थ व पालकांनी दिल्यामुळे बाजार गजबजलेला होता,
या बालबाजारात पहिली ते चाैथीतील मुलांनी, पालेभाज्या, भेळ,शेंगा ,केळी खेळणी,स्टेशनरी साहित्याची दुकाने आनंदाने थाटली होती.यावेळी शिक्षक भंडारे एस.एम,मोहिते एस.एस,घार्गे व्ही.जे, तसेच शाळा व्यवस्थापक अध्यक्ष लहुराज थोरात व सर्व सदस्य, केंद्रप्रमुख रामचंद्र जाधव, विस्तार अधिकारी सुजाता जाधव, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांचे मार्गदर्शन लाभले.
जिल्हा परिषद शाळेने बालबाजार हा उपक्रम राबवल्यामुळे सर्व मुलांच्या व्यवहार ज्ञानात भर पडण्यास मदत होईल,आणि अशा उपक्रमामुळे पालकवर्ग ही शाळेत येऊ लागला याचे नियोजन करणारें सर्व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकांचे अभिनंदन करतो.
लहुराज थोरात
(शाळा व्यवस्थापन अध्यक्ष)
सध्याच्या बालबाजारात विशेष म्हणजे सर्व मुलां-मुलीनी स्वत:च्या घरी पिकणार्या पालेभाज्या,तसेच काही निवडक वस्तू आणल्यामुळे बाजारात सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधले होते, स्वतःला अर्थाजन करता यावे यासाठी या बालबाजाराचे आयोजन करण्यात आले होते.
श्री.गुजरे.के.आर
(मुख्याध्यापक)