Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी २८, २०१९

शिलादेवी पब्लिक स्कूल तर्फे स्केटिंग स्पर्धा

पुरस्काराने विद्यार्थी सन्मानित
वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे:

दत्तवाडी येथील शिलादेवी पब्लिक स्कूलच्या परीसरात स्केटिंग स्पर्धा बुधवार २७ फेब्रुवारी रोजी आयोजीत केली . या स्पर्धेत शिलादेवी पब्लिक स्कूल ,दिल्ली पब्लीक स्कूल ,जैन इंटरनॅशनल स्कूल ,चंदादेवी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांनी उत्साहपूर्वक या स्पर्धेत भाग घेतला होता.

स्केटिंग स्पर्धेचे उदघाटन शिलादेवी पब्लिक स्कूलचे संचालक आशा गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत प्रथम , द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त विद्यार्थी दार्षिका खांटे,नयंशा सिंग, पलक चौरसिया, ओम मिश्रा,हर्षीता कासा, जान्वही कासा, तनय यादव,निहाल पडोले यांना शिलादेवी पब्लिक स्कूलचे मुख्य कार्यकारी अधिकारी व स्पर्धेचे आयोजक आकाश गर्ग ,प्राचार्य हामीद अली खान यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले . यावेळी कोच रतन सिंग,कुणाल दांडेकर,अमृत पोतदार,विशाल वानखेडे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.