चंद्रपूर
शहरवासियांचा उन्हापासून
बचाव करण्यासाठी
हिट ॲक्शन प्लन
चंद्रपूर/प्रतिनिधी:
उन्हाळयात वाढत्या तापमानाची झळ ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात जास्त जाणवते. चंद्रूपर शहर म्हटल तर पारा जरा जास्तच चढतो. त्यामुळे मानवी शरीरावर तसेच सृष्टीतल्या जीवजंतुवर दुषपरीणाम होतात. शिवाय जीव ही गमवावा लागतो. या पासून नागरीकांचा बचाव करण्यासाठी हिट ॲक्शन प्लॅन शहरस्तरीय समीतीची बैठक मनपा उपायुक्त गजानन बोकडे यांच्या अध्यक्षते खाली दि 25 फेब्रुवारी 2019 ला पार पडली.
या सभेमध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अंजली आंबटकर यांनी मागील तीन वर्षाचा आढावा मांडला. सोबतच यावर्षी लोकांचा उष्मघातापासून बचाव करण्यासाठी विविध उपयायोजनांचे पी.पी.टी व्दारे सादरीकरण करण्यात आले. तसेच कृती आराखडयावर चर्चा करण्यात आली. या हिट ॲक्शन प्लॅनच्या माध्यमातुन शासनाच्या विविध विभाग, स्वंयसेवी संस्था, ऑटो रिक्षा असोशियेशन, माता महाकाली मंदिर ट्रस्ट् यांच्या माध्यमातुन प्रत्येक स्तरावर जनजागृती व प्याऊ स्थापीत करण्यात येणार आहे. या बैठकीला सहायक आयुक्त शितल वाकडे व सचिन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधीर मेश्राम, आय. एम. ए. चे डॉ. प्रमोद राऊत, नितेश तेलतुंबडे, महेश बुटले, वैद्यकीय अधिकारी वर्ग तसेच विविध स्वंयसेवी संस्थांचे संचालक उपस्थित होते. उष्मघाता पासून स्वताचे रक्षण करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे नागरीकांनी पालन करावे अशे यावेळी आवाहन करण्यात आले.
नागरीकांना मनपाचे आवाहन.
उन्हापासून संरक्षण करण्यासाठी मनपाने पुढील आवाहन केले आहे
हलके पातळ सुंती कापड वापरावे,प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत घ्यावी,लिंबु-पाणी, ताक इत्यादी चा नेहमी वापर करावा आणि उच्चप्रथीणे असलेले अन्न टाळावे, चहा, कॉफी मद्य, कार्बनेटेड थंड पेय याचा वापर टाळावा. थंड पाण्याने वेळोवेळी आंघोळ करावे, गरोदर कामगार व आजारी कामगाराची अधीकची काळजी करावी, दुपारी 12 ते 4 या कालावधीत बाहेरचे काम करण्याचे टाळावे, गुरांना छावणीत ठेवावे आणि पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, अशक्त पणा, चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.तीन वर्षात उष्मघाताचा एकही मृत्यू नाही. बैठकी दरम्यान मनपा उपायुक्त यांनी हिट ॲक्शन प्लॅनच्या अर्थसंकल्पात वाढ करण्यास मान्यता दिली. त्यामुळे नागरीकांच्या हितासाठी जास्तीचे उपक्रम राबवणे सोईचे होणार आहे.
सोबतच हिट ॲक्शन प्लॅन सकारात्मक परीणाम असा की, शहरात उष्मघाताने एकही मृत्यू झाला नाही यावेळी देखील सर्व कर्मचाऱ्यांनी नागरीकांनाच्या संरक्षणासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.