रथयात्रेने परिसर भक्तिमय
वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे:
श्री संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या प्रगटदिनोत्सवानिमित्त संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या भव्य रथयात्रेने संपूर्ण वाडी परिसर गण गण गणात बोतेच्या गजरांनी दुमदुमुन गेला. दत्तवाडीतील सत्यसाई सोसायटी दुकानदार संघटनेच्या वतीने आयोजीत कार्यक्रमात नगराध्यक्ष प्रेम झाडे, वार्डाचे नगरसेवक नरेश चरडे, केशव बांदरे यांच्या उपस्थितीत महाआरती करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी नारायण गोतमारे, देवेंद्र खाटीक, गजानन देवघरे , बापू लिमकर, चंद्रशेखर देशभ्रतार, निकम, धीरज गणोरकर, बबन ढोबळे आदीसह शेकडो नागरीक उपस्थित होते. गजानन सोसायटी मधील श्री संत गजानन महाराज मंदीरात श्री संत गजानन महाराज प्रगट दिनोत्सव निमीत्य वसंतराव महाराज पोपटे यांचे किर्तन , श्री गजानन याग, श्रीची पालखी , श्रीचा अभिषेक , भजन, संध्याकाळी शांताराम महाराज ढोले यांचे गोपाल काल्याचे किर्तन , संध्याकाळी खा . कृपाल तुमाने , आ . समीर मेघे , नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले . यावेळी अॅड . श्रीराम बाटवे , सुनंदा भट्टलवार , प्रा .एन.पी. पवार , व्ही.जी. मुदलिआर, मुकूंद रंगदळे, टी .बी . निघोट , राजेंद्र तिवारी, प्रशांत कोरपे , सौरभ ताले , मालती शिंदे , नंदीनी तुपकर, विजय शिंदे , आशीष भट्टलवार प्रामुख्याने उपस्थित होते .
खडगाव मार्गावरील वैष्णव माता नगर मधील श्री संत गजानन महाराज मंदीरात काकडा , भक्ती विजया ग्रंथाचे पारायण, सामुहीक भजन , धनेश्वर महाराज ढोरे यांच्या वाणीतुन संगीतमय श्रीमद भागवत सप्ताह , सायंकाळी हरिपाठ, योग शिबीर , श्रीचा पालखी सोहळा , संध्याकाळी मंडळाचे अध्यक्ष राकेश चिल्लोरे , प्रमुख मार्गदर्शक गणेश पटेल हिरणवार ,गंगाधर इखनकर , अनील देशमुख , सतीश डफरे, मनोहर कळंबे, निलेश पेटकर श्रीकांत लांडे , विवेक अवचट , रामभाऊ राऊत , नामदेव चौरे , विजय भरबत उमेश बरडे , विजय पढाल , आशीष शेंडे , आकाश भारसाखरे , संजय डाकरे , अनील जवादे , प्रकाश कालमदे, अनील अखंड यांच्या प्रमुख उपस्थितीत महाप्रसाद वितरीत करण्यात आला .न.प महिला व बालकल्याण सभापती कल्पना सगदेव द्वारा आयोजित संत गजानन महाराज प्रगट दिन कार्यक्रमात नगराध्यक्ष प्रेम झाडे, उपाध्यक्ष राजेश थोराने, सभापती शालिनी रागीट,सभापती मीरा परिहार, बांधकाम सभापती हर्षल काकडे , नगरसेवक नरेश चरडे, केशव बांदरे, दिनेश कोचे ,ज्योती भोरकर,राजूताई भोले, नंदा कदम प्रामुख्याने उपस्थित होते .