Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी २८, २०१९

वाडीत युवक काँग्रेसचा चलो पंचायत अभियान मेळावा

वाडी ( नागपूर ) / अरुण कराळे:

दत्तवाडीतील गुरुदत्त सभागृह मध्ये चलो पंचायत अभियान कार्यक्रम अतंर्गत कार्यकर्ता मेळावा २६ फेब्रुवारी रोजी पार पडला . अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजितदादा तांबे होते . प्रमुख पाहूणे म्हणून नानाभाऊ गांवडे,कुंदाताई राउत,मुजीप पठान प्रामुख्याने उपस्थीत होते . 

 हिंगणा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अशविन बैस यांच्या नेतृत्वात मागील एक महीन्या पासुन चलो पंचायत अभियान सुरु होते या अभियान अंतर्गत हिंगणा विधानसभा क्षेत्रातील गावामधून बेरोजगार युवकांकडुन २००० बेरोजगार कार्ड भरुन घेतले अशी माहीती वाडी शहर अध्यक्ष शैलेश थोराने यांनी दिली . कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान युवासेनेचे शुभम डवरे यांच्यासह काही युवकांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला . 

प्रास्ताविक हिंगणा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अशविन बैस , संचालन पंकज फलके, आभार प्रदर्शन वाडी शहर अध्यक्ष शैलेश थोराने यांनी केले .यावेळी वाडी न.प .उपाध्यक्ष राजेश थोराणे ,शशीकांत थोटे,भीमराव कडु, सागर देशमुख,भीमराव लोखंडे ,अनिल राय,राहुल सीरिया,तौसीफ खान,इरशाद शेख,अजित सिंग,तनवीर विद्रोही,फेजलुर कुरेशी,अनुराग भोयर,महेश चोखांद्रे,रॉबिन शेलारे,श्रीनिवास पक्कला,नितेश भारती,फिरोज शेख,बेबीताई ढबाले,प्रमिला पवार,सुरेखा कटे,मीना कोडापे,गौतम तिरपुडे,भीमराव कांबले,किशोर नागपुरकर,विनोद लंगोटे,आशिष पाटिल,पुरुषोत्तम लिचड़े,ईश्वर उघडे,गणेश बावने,सागर बैस,मिथुन वायकर,निकेश भागवतकर,पंकज फलके,अभिनव वडडेवार,पियुश बांते,शुभम बघेले,हिमांशु बावने,अविनाश बांरगे,तेजस चह्वान,हर्ष वेदय,शेषराव टीस्के,इशांत जंगले,रोशन येलने,नामदेव चौरे,भांगेजी,अशोक गडलिंगे,सिदार्थ बागड़े,जोत्सना रहागडाले,फैसल नागाणी,निखिल पाटील,अमोल केने,राजेश खंगारे,रोहन नागपुरकर,कुनाल बांते,अनुप चरभे,सूरज पांडे प्रामुख्याने उपस्थित होते .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.