Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी १७, २०१९

२२ फेब्रुवारीपासून अभियांत्रिकी व विज्ञान तंत्रज्ञान राष्ट्रीय परिषद

श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आयोजन 


चंद्रपूर : स्व. एम.डी.येरगुडे मेमोरियल शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरद्वारे संचालित श्री साई अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने दोन दिवसीय अभियांत्रिकी विज्ञान व तंत्रज्ञानातील उद्योन्मुख राष्ट्रीय परिषदेचे आयोजन २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयात करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. व्ही. एम. येरगुडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अग्रवाल यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रपरिषदेत दिली. .

परिषदेचे उद्घाटन २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. कल्याणकर यांच्या हस्ते होणार असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभियांत्रिकी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. कट्टी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. जी. भुतडा, इन्स्टीट्यूट ऑफ इंजिनिअर्स चंद्रपूरचे अध्यक्ष प्रा. डॉ. वी. एस. गोरंटीवार, टीसीएसचे केंद्र प्रमुख अरविंद कुमार, जेएसडब्लूचे प्लांटहेड मुकुल वर्मा, बजाज स्टील इंडस्ट्रीज लिमिटेडचे सीईओ डॉ. शर्मा आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

दोन दिवसीय परिषदेत वेगवेगळ्या सहा ट्रॅकमध्ये ४ तांत्रिक सत्र होणार आहे. २३ फेब्रुवारीला वैधता कार्यक्रम होईल. या कार्यक्रमासाठी अभियांत्रिकी पारंपरिक ऊर्जा केंद्र अकोलाचे प्रमुख डॉ. आर. बी. गोहाणे, गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यांकन निदेशक डॉ. अनिल चिताडे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भुतडा, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. झेड. खान उपस्थित राहणार आहे. संस्थेचे अध्यक्ष व्ही. एम. येरगुडे परिषदेचे अध्यक्ष असतील. परिषदेत पाचशेवर अभियांत्रिकीचे विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.