बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल करा - राजू कुकडे
चंद्रपूर : मुदतीनंतरही गुंतवणूकदारांचे पैसे देण्यास टाळाटाळ करीत असलेले बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र सत्यनारायण अंगावारसह संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हा संघटक राजू कुकडे यांनी शनिवारी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रपरिषदेत केली आहे.
रवींद्र अंगावार यांनी बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करून विवेकनगर येथे पतसंस्थेचे कार्यालय थाटले आहे. या पंतसंस्थेमार्फत दैनंदिन वसुली एजंट नेमून एजंटमार्फत छोट्यामोठ्या व्यावसायिक, नोकरदार, गृहिणी यांचे दैनंदिन ठेव खाते उघडण्यात आले. अनेकांनी एजंटवर विश्वास ठेवून या पंतसंस्थेत पैसे गुंतविले आहे. मात्र, काही गुंतवणूकदारांना मुदतीनंतरही पैसे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने गुंतवणूकदारांचे पैसे पंतसंस्थेत अडून आहेत. ग्राहकांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पतसंस्थेच्या अध्यक्षावर ग्राहक संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी राजू कुकडे यांनी याप्रसंगी केली. दरम्यान, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा उपनिबंधकाकडेही संस्थेच्या अध्यक्षाविरुद्ध तक्रार देण्यात आल्याचे कुकडे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला मनसेचे बळीराम शेळके, वनिता चिलके, कोटेश्वरी गोहणे, अतुल दिघाटे, सुमन चामलाटे, पतसंस्थेचे दैनंदिन वसुली प्रतिनिधी भीमराव डोंगरे, गणेश शेंडे, आकाश चांदेकर उपस्थित होते.