Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी १०, २०१९

आगामी निवडणुकीत भाजप-सेनेला त्यांची जागा दाखवा:प्रकाश आंबेडकर

वाडीत वर्ल्ड हिंदी न्यूज चॅनलचे उदघाटन
वाडी(नागपूर)/अरुण कराळे: 

आजच्या घडीला देशात राजकीय, सामाजिक स्थिती व आर्थिक व्यवस्था पूर्णपणे ढासळली असून सर्वत्र अराजकता निर्माण होऊन देशातील सर्वसामान्य माणूस महागाईने भरडून गेला आहे,गरिब गरिबीचे जीवन जगत आहे .तर श्रीमंताची वाटचाल श्रीमंतीकडे होत आहे .शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे.
यातून सुटका करण्यासाठी आगामी निवडणुकीत भाजप-सेनेला त्यांची जागा दाखवा असेआव्हान भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष अॅड . प्रकाश आंबेडकर यांनी वाडीत वर्ल्ड हिंदी न्यूज चॅनलचे उदघाटन करतांना उपस्थितांना केले . यावेळी वर्ल्ड हिंदी न्यूजचे संपादक विजय खवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ पाटील ,भारीप बहूजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितेश जंगले,प्रदेश सचिव गुणवंत देवपारे,सागर डबरासे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम मंडपे,राजेश जंगले, राजकुमार चरडे,नगरसेवक आशिष नंदागवळी,पत्रकार विजय तायडे,भीमराव लोणारे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वाडी शहर अध्यक्ष राजेश जिरापुरे, नागपूर पंचायत समिती उपसभापती सुजित नितनवरे,लाव्हाचे उपसरपंच महेश चोखांद्रे,दिनेश उईके,नागपूर तालूका ग्रामीण पत्रकार संघाचे सुरेश फलके,अरुण कराळे, अजय तायवाडे नटवर अबोटी,समाधान चोरपगार , प्रामुख्याने उपस्थित होते.
 देशाला कोणी हाय जॅक करतो तर त्याला काढून टाकते आणि फेकले पाहिजे .बाबासाहेबांच्या अर्थव्यवस्थेच्या आधारे नागपूरचे अधिवेशन घेतले गेले होते.ईव्हीएम मशीन घोटाळाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की,सर्व पक्षांनी सर्वच निवडणुकांचा बहिष्कार करावा,ईव्हीएम व्ही पॅडमधून बाहेर पडलेल्या पेपर ट्रेलर्सची मोजणी करावी.असे अनेक प्रश्नांची रोखठोक उत्तरे उपस्थित पत्रकरांच्या प्रश्नांची बाळासाहेबांनी यावेळी दिली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.