वाडी (नागपूर)/अरूण कराळे:
येथील दत्तवाडीतील इंद्रायणी सोसायटीमधील रहीवाशी ट्रान्सपोर्ट व्यावसायीक भारत चोखांद्रे यांनी गुंटूर येथील राष्ट्रीय अँथेलेटिक मास्टर संघाद्वारा आयोजित ४०० मीटर दौड स्पर्धेत प्रथम स्थान पटकाविल्यामुळे एप्रिल २०१९ मध्ये होणार्या मलेशियामध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर प्रतियोगीता करीता निवड करण्यात आली आहे . त्यांनी महाराष्ट्र अँथेलेटिक मास्टर संघाद्वारा पूणे येथे २०० व ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होऊन विजय प्राप्त केला होता .
या उत्कृष्ट कामगिरी बद्दल वाडीचे भारत चोखांद्रे यांचे नगराध्यक्ष प्रेम झाडे, माजी उपनगराध्यक्ष नरेश चरडे ,उपनगराध्यक्ष राजेश थोराने, बांधकाम सभापती हर्षल काकडे, सभापती कल्पना सगदेव, सभापती शालिनी रागीट , सरीता यादव ,नगरसेवक श्याम मंडपे, डॉ. सारिका दोरखंडे ,नरेंद्र मेंढे, राकाँ सामाजिक न्याय विभाग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, पं .स.उपसभापती सुजित नितनवरे , शिवसेना नेते वसंतराव इखनकर, संतोष केचे, संतोष अनासने, रुपेश झाडे , प्रा . मधू मानके पाटील, सचिन बोंबले, काँग्रेसचे प्रकाश कोकाटे, दुर्योधन ढोणे, शैलेश थोराने ,अश्विन बैस, ट्रान्सपोर्ट नेता मानसिंग ठाकूर, राकेश चिल्लोरे , किताबसिंग चौधरी, गोविंदराव रोडे, कमल कनोजे, पत्रकार विजय खवसे, नागपूर तालुका पत्रकार संघाचे सुरेश फलके , अरुण कराळे , अजय तायवाडे ,नटवर अबोटी, सौरभ पाटील , समाधान चौरपगार आदींनी अभिनंदन केले.