पुसेसावळी ( राजु पिसाळ ):
चोराडे (ता.खटाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यानी सातारा येथे आयोजित केलेल्या स्व.यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धामधील लोकनृत्य विभागातुन जिल्हास्तरावर व्दितीय क्रमांक व तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला.तरी या लोकनृत्य स्पर्धेत अर्जुन मदने,शुभम पिसाळ, निखिल पोतदार,प्रथमेश अवघडे, अमन मुल्ला, प्रतिक अवघडे, संस्कृती पिसाळ,अस्मिता पिसाळ,सिद्धी लोकरे, हिना मुल्ला,निहाल मुल्ला साहिल पिसाळ, तेहजीब मुल्ला,कुणाल सरावणे,सानवी घुटुगडे,मिनाक्षी माळी, या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
तरी यशस्वी विद्यार्थ्याचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.या विद्यार्थ्याना व्यंकटेश कांबळे सर, नवनाथ साबळे सर,
अमोल भिसे सर,राजेंद्र ताटे सर व मुख्याध्यापक अर्चना बिरादार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.तरी यशस्वी विद्यार्थ्याचे सभापती कल्पना मोरे, उपसभापती संतोष सांळुखे,पं.स.सदस्या रेखा घार्गे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, केंद्र प्रमुख रामचंद्र जाधव, आदिंसह चोराडेतील सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.