पुसेसावळी (राजु पिसाळ ) :
पुसेसावळीत व परिसरातील मळयामध्ये वानरांकडुन पिकांची नासधुस होत असल्या मुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे.हरभरा व शाळु पिकांचे होत असलेल्या नुकसाना मुळे शेतकर्यांची हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याच्या मार्गावर असल्याने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त कोण करणार याकडे शेतकरी आस लावुन बसला आहे,
सद्य:स्थितीत पुसेसावळी परिसरात पिके चांगल्या प्रकारची असुनही या पिकांवर मावा चिकटा या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या मोठ्याप्रमाणात दिसत आहे तरी शेतकरी वर्ग आैषधांची फवारणी करत असुन पिकावरील रोगराईवर नियत्रंण आणत आहे.परंतु या वन्यप्राण्यांच्या पासुन आलेली पिके वाया जाणाच्या भितिने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त आहे.
सध्या या परिसरामध्ये वानरांच्या टोळीने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान मोठ्याप्रमाणात केले आहे हरभरा पिकांचे तर पुर्णपणे नुकसान केलेले आहे,तसेच या वानरांची टोळीचा मोर्चा गावाकडे येत असल्यामुळे लहान मुलांच्यात घबराटीची वातावरण निर्माण झाले आहे तरी याबाबत वनविभागाने ठोस भुमिका घ्यावी.