Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जानेवारी २३, २०१९

गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार


- सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले

नवी दिल्ली, २३ : केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेंतर्गत गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालक मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे दिली.

श्री. बडोले यांनी आज उद्योग भवन येथे नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत श्री. बडोले यांनी गोंदिया येथे विमानसेवा सुरु करण्याची मागणी केली. उभय मंत्र्यांमध्ये यावेळी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर केंद्र शासनाच्या उडान योजनेंतर्गत गोंदिया येथे विमान सेवा सुरु करण्याची ग्वाही श्री. प्रभू यांनी दिल्याचे श्री. बडोले यांनी सांगितले. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचेही श्री. बडोले म्हणाले.

गोंदिया येथे विमान सेवा सुरु झाल्यास या भागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही श्री. बडोले यांनी व्यक्त केला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.