सार्डचा जनजागृति कार्यक्रम
चंद्रपूर/प्रतिनिधी:वन्यजीव सवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ” सोशल अक्शन फॉर रूरल डेवलपमेंट” सार्ड या संस्थेच्या वतीने नुकतेच “सोलर करन्ट प्रणाली” या विषयावर भद्रावती तालुक्यातील पारोधी या गावी मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पड़ला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रपुर येथील श्री. राहुल बलकि चंद्रपुर आणि सार्ड संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कामडे हे होते . सध्या शेतकऱ्यांच्या शेतात कापूस, तूर ,सोयाबीन, धान, या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. परंतु आपल्या जिल्ह्यात वन्य जीवांचा वावर सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्यात डुक्कर हां प्राणी मोठ्या प्रमाणात आहे. अनेक शेतकऱ्यांचे मोठे मोठे शेतातील उभे पिक नष्ट केलेले आहे. शेतकरी सध्या पिकांच्या नुकसानी मुळे भयंकर चिंतेत आहे. त्यातच सार्ड चे अध्यक्ष प्रकाश कामडे याना ही माहिती देण्यात आली. त्यानी तद्न्य व्यक्ती राहुल बलकि यांना सोबत घेऊन पारोधी गाव गाठले . तिथे गावातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र गोळा करुन सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रकाश कामडे यानी अवैध विद्युत प्रवाह शेतात सोडल्यास त्याचे काय दुःष परिणाम होतात, एक छोटीशी चूक झाल्यास त्याची किम्मत संपूर्ण कुटुंबाला जीवन भर कशी चुकवावी लागते, मनुष्य जीवनाची हानि कशी होऊ शकते . हे समजावून सांगितले . या नन्तर राहुल बलकि यानी प्रणाली मध्ये डूकरांणसाठी फ़क्त सोळा गेज चा एक तार जमीनी पासून दीड फुट उंचीवर बांदायचा असतो. त्या सोबतच एक बैटरी तिन हजार रुपये आणि सोलर पैनल दीड हजार रुपये असे एकूण पाच हजार रुपये मध्ये आपन डुकर या प्राण्या पासून शेताचे सव्रक्षण करू शकतो. असे त्यानी सांगितले. या प्रणाली विषयी शेतकऱ्यांनी बरेच प्रश्न विचारुन आपले समाधान करुन घेतले.लावायाच्या पद्धति, बैटरी चार्ज करने,तार लावणे ,सोलर प्लेट लावणे, इत्यादि समस्या सोडवून घेतल्या.व पंधरा नग मशीन विकत घेतल्या.
या प्रसंगी गावातील सधन कास्तकार बंधू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशश्विते करिता संतोष कामडे, संजय रामटेके, प्रेमचन्द कामडे, मनोज आसुटकर, भालचंद्र शेम्बळकर, गोपीचन्द कामडे,आशीष विरुटकर,नितीश विरुटकर, आकाश कामडे, उत्तम खिरटक़र नगाजी कुण्डलकर, नामदेव रामटेके,आनंदराव गिरसावाले,यानी अथक परिश्रम घेतले.