Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

SARD लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
SARD लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ऑक्टोबर ०५, २०१८

‘सोलर करन्ट प्रणाली’ यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन कार्यकम

‘सोलर करन्ट प्रणाली’ यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन कार्यकम

सार्डचा जनजागृति कार्यक्रम 
चंद्रपूर/प्रतिनिधी:

वन्यजीव सवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ” सोशल अक्शन फॉर रूरल डेवलपमेंट” सार्ड या संस्थेच्या वतीने नुकतेच “सोलर करन्ट प्रणाली” या विषयावर भद्रावती तालुक्यातील पारोधी या गावी मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पड़ला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रपुर येथील श्री. राहुल बलकि चंद्रपुर आणि सार्ड संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कामडे हे होते . सध्या शेतकऱ्यांच्या शेतात कापूस, तूर ,सोयाबीन, धान, या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. परंतु आपल्या जिल्ह्यात वन्य जीवांचा वावर सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्यात डुक्कर हां प्राणी मोठ्या प्रमाणात आहे. अनेक शेतकऱ्यांचे मोठे मोठे शेतातील उभे पिक नष्ट केलेले आहे. शेतकरी सध्या पिकांच्या नुकसानी मुळे भयंकर चिंतेत आहे. त्यातच सार्ड चे अध्यक्ष प्रकाश कामडे याना ही माहिती देण्यात आली. त्यानी तद्न्य व्यक्ती राहुल बलकि यांना सोबत घेऊन पारोधी गाव गाठले . तिथे गावातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र गोळा करुन सखोल मार्गदर्शन केले. 
कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रकाश कामडे यानी अवैध विद्युत प्रवाह शेतात सोडल्यास त्याचे काय दुःष परिणाम होतात, एक छोटीशी चूक झाल्यास त्याची किम्मत संपूर्ण कुटुंबाला जीवन भर कशी चुकवावी लागते, मनुष्य जीवनाची हानि कशी होऊ शकते . हे समजावून सांगितले . या नन्तर राहुल बलकि यानी प्रणाली मध्ये डूकरांणसाठी फ़क्त सोळा गेज चा एक तार जमीनी पासून दीड फुट उंचीवर बांदायचा असतो. त्या सोबतच एक बैटरी तिन हजार रुपये आणि सोलर पैनल दीड हजार रुपये असे एकूण पाच हजार रुपये मध्ये आपन डुकर या प्राण्या पासून शेताचे सव्रक्षण करू शकतो. असे त्यानी सांगितले. या प्रणाली विषयी शेतकऱ्यांनी बरेच प्रश्न विचारुन आपले समाधान करुन घेतले.लावायाच्या पद्धति, बैटरी चार्ज करने,तार लावणे ,सोलर प्लेट लावणे, इत्यादि समस्या सोडवून घेतल्या.व पंधरा नग मशीन विकत घेतल्या. 
या प्रसंगी गावातील सधन कास्तकार बंधू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशश्विते करिता संतोष कामडे, संजय रामटेके, प्रेमचन्द कामडे, मनोज आसुटकर, भालचंद्र शेम्बळकर, गोपीचन्द कामडे,आशीष विरुटकर,नितीश विरुटकर, आकाश कामडे, उत्तम खिरटक़र नगाजी कुण्डलकर, नामदेव रामटेके,आनंदराव गिरसावाले,यानी अथक परिश्रम घेतले. 



शुक्रवार, ऑगस्ट ०३, २०१८

सार्ड तर्फे जागतिक व्याघ्र दिन साजरा

सार्ड तर्फे जागतिक व्याघ्र दिन साजरा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
29 जुलै हां दिवस जगभर जागतिक व्याघ्र दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निम्मित्याने वाघ व वन्यजीव या बद्दल जनजागृति केलि जाते. व वन्यजीव सवर्धनात सामान्य लोकांचा सहभाग वाढविला जातो याचेच ओचित्य साधुन “सोशल अक्शन फॉर रूरल डेवलपमेंट “(सार्ड) चंद्रपुर या वन्यजीव क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख विद्यालय चंद्रपुर येथे “आंतर राष्ट्रीय व्याघ्र दिवस” साजरा करण्यात आला. या प्रसंगी मंचावर अध्यक्ष म्हणून सौ. कलाताई गोंदे शाळेच्या मुख्याध्यापिका , तर प्रमुख पाहुने म्हणून महाराष्ट्र इको टूरिझम डेवलपमेंट बोर्ड चे सदस्य श्री.अरुणजी तीखे सर, सार्ड संस्था अध्यक्ष श्री.प्रकाश कामडे , अतिरिक्त कार्यकारी अभियंता महापारेषण चंद्रपुर सौ.सुवर्णा कामडे, सार्ड सदस्य भाविक येरगुड़े हे मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निम्मिताने विद्यार्थ्यांना विविध जंगल, वन्यजीव, वाघ , त्यांचे महत्व अन्न साखळीत त्यांची भूमिका इत्यादींचे महत्व पटवून देण्यात आले.श्री अरुणजी तीखे यानी त्यांचे जीवन वनविभागाची सेवा करण्यात कसे गेले, ताडोबाच्या निर्मिति मध्ये कुठली महत्वाची कामे त्यानी हाताळलि या बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली, श्री. प्रकाश कामडे यानी मानव वन्यजीव संघर्ष कसा निर्माण होतो आणि या तुन वाघांचि संख्या कशी कमी होत आहे. भविष्यारत वाघ वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग कसा महत्वाचा असू शकतो हे समजावून सांगितले. सौ सुवर्णा कामडे यांनी वन्यजीवांवर प्रेमकरा त्यांचे रक्षण करा तरच पर्यावरण वाचेल असा सन्देश दिला, भाविक येरगुड़े यानी जंगलांचे महत्व व त्यांचे जतन कैसे करावे,व्रुक्षरोपनाचे महत्व या बद्दल मार्गदर्शन केले. हां कार्यक्रम संपताच सर्व पाहुन्यांच्या हस्ते शाळेत व्रुक्षारोपन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन श्री.महेंद्र राळे सर, तर आभार प्रदर्शन श्री वाढई सर यानी केले कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता कमलाकर व्यवहारे, मंगेश लहामागे, संजय जावड़े, स्वप्निल राजुरकर,विलास माथानकर, प्रवीण राळे,आनंद कांबळे,सदानंद आगबत्तनवार व शाळेतील शिक्षक वृंद यानी परिश्रम घेतले.

सोमवार, एप्रिल १६, २०१८

SARD च्या पुढाकाराने टायगर कन्झर्वेशन विषयावर कार्यशाळा संपन्न

SARD च्या पुढाकाराने टायगर कन्झर्वेशन विषयावर कार्यशाळा संपन्न

चंद्रपूर/प्रतिनिधी:
भारतात दिवसेंदिवस जंगलांचे क्षेत्र कमी होत आहे व लोकांचे जंगलांवरील अतिक्रमण वाढतच आहे. जंगलात लोकांचा हस्तक्षेप खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे वन्य जीवांच्या अधिवासावर गंभीर परिणाम होत आहे. कुठल्याही व्याघ्र प्रकल्पात मोठे झालेले वाघ व इतर वन्यजीव यांना जगण्यासाठी स्थलांतरण करावे लागते. त्यामुळे वन्यजीवांचे तसेच वाघांचे भ्रमणमार्ग हे सुदृढ असणे गरजेचे आहे. या परिस्थितीचा अभ्यास जिल्ह्यातील गाव खेड्यात वन्यजीव क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व संस्थाना व्हावा यासाठी “सोशल एक्शन फॉर रुरल डेव्हलप्मेंट (सार्ड)” चंद्रपूर या संस्थेच्या वतीने ‘टायगर कन्झर्वेशन’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन स्थानिक आय एम ए सभागृहामध्ये करण्यात आले. यात जिल्ह्यातील विविध संस्थांच्या ९० वन्यजीव प्रेमींनी सहभाग घेतला.
या कार्यशाळेला उद्घाटक म्हणून मुख्य वनसंरक्षक श्री. विजय शेळके तर अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक श्री. संजयजी ठाकरे, प्रमुख अतिथी म्हणून वाईल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया चे महाराष्ट्र प्रमुख श्री. प्रफुल्ल भाम्बुरकर, सातपुडा फौंडेशन अमरावतीचे अध्यक्ष श्री. किशोर रिठे, चंद्रपूर चे पर्यावरणतज्ञ श्री. सुरेश चोपणे, वाईल्ड लाइफ कन्झर्वेशन ट्रस्ट चे श्री. आदित्य जोशी, सार्ड संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कामडे, 
तसेच जेष्ठ पर्यावरण प्रेमी  श्री. सुर्यभानजी खोब्रागडे हे मंचावर उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरणतज्ञ प्रा. डॉ. योगेश दुधपचारे, वन्यजीव अभ्यासक उदय पटेल, पर्यावरणतज्ञ सचिन वझलवार व जलमित्र संजय वैद्य हे मंचावर उपस्थित होते.
मुख्य वनसंरक्षक श्री. विजय शेळके यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात वन्य जीवांचे रक्षण, त्यांचे अधिवास व भ्रमण मार्ग टिकवून ठेवणे व त्यांना सुदृढ ठेवणे हे गरजेचे असल्याचे सांगितले.
कार्यशाळेत मुख्यत्वे तीन विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. त्यात “ इम्पोर्टन्स ऑफ कोर्रीडोर एंड इट्स मेंटेनन्स” या विषयावर मार्गदर्शन करतांना डब्लू.टी.आय. चे श्री. प्रफुल्ल भाम्बुरकर व श्री. प्रफुल्ल चौधरी यांनी वन्य जीवांच्या भ्रमण मार्गातून जाणारे राष्ट्रीय व राज्य महामार्ग तसेच कालवे यांचे भयानक परिणाम वन्य प्राण्यांना भोगावे लागते याकडे सर्वांचे लक्ष वेधले. दुसरा विषय “पार्टीसिपेषण ऑफ एन.जी.ओ. इन टायगर कन्झर्वेशन” यावर बोलतांना श्री. किशोर रिठे यांनी वन्यजीव प्रेमींना भविष्यात वन्यजीव क्षेत्रात मोठे काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते तसेच त्यांनी आपसातील मतभेद विसरून सर्वांनी मिळून काम करण्याची गरज असल्याचे सांगितले.
 तिसरा विषय “इम्पेक्ट ऑफ लिनिअर इन्फ्रास्ट्रक्चर ऑन वाईल्ड लाइफ कारीडोर इन ग्रेटर ताडोबा लेन्ड्स्केप” यावर बोलतांना श्री. आदित्य जोशी यांनी भ्रमण मार्गांच्या अशा प्रकारच्या समस्यांवर उपाय म्हणून ओवरपासेस बांधण्याच्या संकल्पनेची शास्त्रशुद्ध माहिती आपल्या प्रेझेन्टेशन मधून दिली.
या कार्यक्रमाचे यशस्वी संचालन सदानंद आगाबत्तांवर व सौ. सुवर्णा कामडे यांनी तर प्रस्ताविक व आभार प्रदर्शन प्रकाश कामडे यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता सार्ड संस्थेचे सदस्य मंगेश लहामगे, भाविक येरगुडे, विलास माथनकर, प्रवीण राळे, अनुप येरणे, संजय जावडे, आनंद कामडे, रंजन खटी, राजेश पेश, अतुल वाघमारे, महेंद्र राळे, कमलाकर व्यवहारे, दीपक वांढरे यांनी अथक परिश्रम घेतले.