Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर ०७, २०१८

कारंजाच्या अर्थसंकल्पीय बजेटला मंजुरी

३८.०५ कोटी रूपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन 

कारंजा/उमेश तिवारी:
आर्वी विधानसभा क्षेत्रातील विविध गावे पक्क्या रस्त्यांनी जोडून गावांचा विकास करण्यासाठी, शेतकऱ्यांना शेतमाल वाहतूकीसाठी, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, वयोवृद्ध नागरीकांना व रूग्णांना उपचारासाठी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना इतर कामांसाठी योग्य वेळी योग्य ठिकाणी सुरळीत पोहोचण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागातील पोहच रस्ते चांगले असने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे माजी आमदार दादाराव केचे यांनी आर्वी विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात रस्त्यांचे तथा पुलांचे बांधकाम करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्या कडे पाठपुरवठा केला असता अर्थसंकल्पात आर्वी विधानसभा क्षेत्रातील आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्याकरीता ५८ कोटी रुपयांची विकास कामांना मंजुरी दिली होती. त्यापैकी कारंजा तालुक्यातील ३८.०५ कोटी रूपयांचे भुमिपुजन माजी आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य तथा पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य तथा पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि परीसरातील नागरीकांच्या उपस्थितीत आज शुक्रवारी संपन्न झाले.
या मध्ये कारंजा तालुक्यातील रस्त्यामध्ये हिंगणी - बोरधरन - गरमसुर - मेटहिरजी - धानोली - राहाटी - सावली (अंतर २३ ते ४५ कि. मी.) किंमत ५९५ लक्ष रूपये, पिंपळखुटा - दाणापुर - खैरवाडा - ब्राह्मणवाडा (अंतर ० ते १५.६०० कि. मी.) किंमत ४१५ लक्ष रुपये, सुकळीबाई - बांगळापुर (अंतर १७ ते ३३ कि. मी.) किंमत ४०२ लक्ष रूपये, पार्डी - सारवाडी - सावळी - चिंचोली - सेलगाव (उ) - उमरी - धावसा - कन्नमवार (अंतर ० ते ३६ कि. मी.)किंमत ३९६ लक्ष रुपये, सुकळीबाई - बांगडापुर (अंतर ३३ ते ४५ कि. मी.) किंमत ३२५ लक्ष रुपये, वडाळा - साहूर - मानिकवाडा - सुसुंद्रा - काकडा - परसोडी - सेलगाव - ठाणेगाव (अंतर ३३ ते ४३ कि. मी.) किंमत ३२४ लक्ष रुपये तसेच याच रस्त्यावरील अंतर २१ ते ३३ कि. मी. करीता २८४ लक्ष रुपये, कारंजा - मोर्शी - खरसखांडा (अंतर ३.८०० ते ७.००० कि. मी.) किंमत २३६ लक्ष रुपये, काटोल - धर्ती - बोरी - ठाणेगाव (अंतर १३.४०० ते १८.४०० कि. मी.) किंमत १७० लक्ष रुपये, ठाणेगाव - खरसखांडा - सावळी (अंतर ० ते ३.२०० कि. मी.) किंमत १०५. ६०लक्ष रुपये, कारंजातील बायपास करीता ७६ लक्ष रुपये, ढगा - ब्राह्मणवाडा (अंतर ० ते १०.६०० कि. मी.) किंमत ७६ लक्ष रुपये, कारंजा बायपास कि. मी. ० /० ते ३/०० रस्त्यांचे बांधकाम करणे किंमत ७६.२० लक्ष रूपये मंजूर करण्यात आले आहे.
या ५८ कोटींच्या विकास कामामुळे आर्वी विधानसभा क्षेत्र सर्वांगीण विकसित होण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार शहरी तथा ग्रामीण भागातील विकासाची कामे करण्यासाठी कटिबद्ध आहे तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा नवनिर्माण होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामिण भागातील रस्त्यांची असणारी दुर्दशा सर्वांनी अनुभवली आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचे सरकार जनतेच्या सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी काँग्रेसच्या राजवटीत कधीही न झालेले अत्यावश्यक असणारे रस्ते होणार आहेत असे माजी आमदार दादाराव केचे यांनी याप्रसंगी सांगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांचे आभार निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल दादाराव केचे यांनी मानले. तसेच हि कामे मंजूर करण्यासाठी सुमित वानखेडे यांनी विशेष प्रयत्न केले होते.
याप्रसंगी नितीन मडावी अध्यक्ष जि. प. वर्धा, कांचन नांदुरकर जि.प.उपाध्यक्षा वर्धा, जयश्री गफाट सभापती जि.प. वर्धा, निता गजाम सभापती जि. प. वर्धा, रेवता धोटे जि. प. सदस्या, सरिता गाखरे जि. प. सदस्या, सुरेश खवशी जि. प. सदस्य, मंगेश खवशी सभापती कारंजा पं. स. रंजना टिपले उपसभापती पं. स. कारंजा, जगदीश डोळे पं. स. सदस्य, आम्रपाली बागडे पं. स. सदस्या, पुष्पा चरडे पं. स. सदस्या, रोषना ढोबाळे पं. स., मुकुंद बारंगे अध्यक्ष कारंजा तालुका भाजप, मोरेश्वर भांगे, संजय कदम, शिरीष भांगे, विजय गाखरे, शांताराम ढबाले, शेख निसार, राजुभाऊ डोंगरे, रामभाऊ लवणकर, सुरेश वंजारी, हरिभाऊ जसुतकर, किशोर भांगे, वसंतराव भांगे, गजू सरोदे, सुनिल खडसे, मोरेश्वर सरोदे, अशोक बेलखेडे, मंगला कोकाटे सरपंच, रमेश बोडखे उपसरपंच, दिलीप बोडखे, संजय नासरे, बाबाराव रेवतकर, ज्ञानेश्वर म्हस्के, धनराज बोडखे, हर्षकला गिर्‍हाडे सरपंच, ब्रिजमोहन टावरी उपसरपंच, जिवन गिर्‍हाडे, कपिल खवशी, लिलाधर दंडाडे, रमेश दंडाडे, हरीशचंद्र करनाके, शारदा गाखरे सरपंच, केमराज ढोबाळे उपसरपंच, पांडुरंग मानमोडे, वामनराव गाखरे, गजानन ढोबाळे, सुरेश ढोबाळे, प्रकाश गाखरे, वासुदेव पांढुरकर, उर्मिला देशमुख, मिना कडवे, तारा ढोबाळे,हेमराज मोहड मिराबाई हिंगवे सरपंच, मनोज दंडारे उपसरपंच, शामसुंदर चोपडे, नथ्युजी पठाडे, भागवत चौधरी, रामभाऊ नासरे, मारोतराव बालपांडे, प्रमिला बोरकर सरपंच, साहेबराव पांडे उपसरपंच, मधुकर भगवे, हिरामण मलवे, वासुदेव कांबळे, विनायक भांगे, सोनुजी दारव्हेकर, जानराव होके, वसंतराव नासने, सुरेश बारव्हे, ओंकार सिंदूरकर, कमला कोकर्डे सरपंच, नामदेव देवासे उपसरपंच, बाबाराव नासरे, गजानन देवासे, संजय पठाडे, चंद्रशेखर देवासे, आशिष ठाकरे, राजु चौबे, श्रीधर धामनकर, बुद्धेश्वर पाटील, वसंतराव मुने, अर्जुन मुने, अजय चोपडे, राजू काळे, आनंदराव कालोकार, रवी धुर्वे, अजय सलाम यांच्या सहीत परीसरातील नागरीकांची लक्षणीय उपस्थिती होती.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.