Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर ०७, २०१८

विकोची सामाजिक बांधिलकी - संजीव पेंढरकर


नागपूर - अर्थसंकेत नवं उद्योजक पुरस्कार सोहळा 2018 - वर्श चैथे !“ मराठी समाजातील नव उद्योजकांचे कर्तृत्व जगासमोर आपणण्याचा एक आगळा प्रयत्न म्हणजेच अर्थसंकेत नवं उद्योजक पुरस्कार सोहळा ! असे उद्योजक ज्यांनी षून्यातून एक उद्योग उभा केला ज्यांनी आपल्या आयुश्याची जोखीम घेऊन उद्योग निर्माण केला, रोजगार निर्माण केले, समाजाचे देणे फेडले, अषा उद्योजकांचे कौतुक करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो

”नवं उद्योजक पुरस्कार हा एकमेव पुरस्कार सोहळा आहे ज्या अंतर्गत नवीन उद्योजकांचा गौरव केला जातो ज्या उद्योजकांनी नवीन व्यवसाय सुरु केला आहे आणि स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे, त्यांना पुढच्या पायरीवर जाण्यासाठी, ज्या व्यासपीठाची आवष्यकता असते ते व्यासपीठ अर्थसंकेतने निर्माण केले आहे“, असे उद्गार विको लॅबोरेटरीजचे संचालक श्री संजीव पेंढरकर यांनी स्टार्टअप उद्योग पुरस्कार वितरण संमारंभात काढले त्यांना हया प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते त्यांनी नविन उद्योजकांना समजेल अषा भाशेत मार्गदर्षन केले.

अमितजी बागवे व रचना बागवे हयांनी अतिषय उत्साहाने वेलिंगकर सभागृहात गुरुवार दिनांक 6 सप्टेंबर 2018 रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले होते हया कार्यक्रमाला उद्योजकांना मार्गदर्षन करावयास नितीनजी पोतदार, एमसीसीआयएचे प्रेसिडेंट श्री मंडलेचा, श्री महेष नरवडे, श्री विनोद मेस्त्री व श्री बिपीन पोटेजी उपस्थित होते

मराठी समाजाप्रती बांधिलकी जपण्यासाठी अर्थसंकेतद्वारे नेहमीच काही ना काही नवीन उपक्रम राबविले जातात व विको लॅबोरेटरीजचा अषा उपक्रमांना नेहमीच सहकार्य व सहयोग असतो मराठीतील नवं उद्योजकतेचा सन्मान करणे व त्यांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी अर्थसंकेत घेऊन येत आहे, असे पुढे पेंढरकर म्हणाले.

व्यवसायातील नाविन्यता, व्यावसायिक अनुभव, व्यावसायिक यष, वैयक्तिक यष, सामाजिक कार्य व पुरस्कार या निकशांवर पुरस्कार दिले गेले कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला व तरुणांना मार्गदर्षनही मिळाले

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.