Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, सप्टेंबर १६, २०१८

नगरपंचायत कारंजा तर्फे 'स्वच्छता ही सेवा' उपक्रमाचा शुभारंभ

स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये सर्वोत्तम कामगिरी नोंदविण्याचे आवाहन
कारंजा/प्रतिनिधी:
नगरपंचायत कारंजा तर्फे स्वच्छता ही सेवा या उपक्रमाचा शुभारंभ दिनांक 15 सप्टेंबर 2018 ला स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आला.तर उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी आठवडी बाजार परिसरात नगरपंचायत कर्मचारी व स्थानिक दुकानदारांमार्फत स्वच्छता करण्यात आली.
या उपक्रमात स्थानिक दुकानदारांनीसुद्धा परिसरातील स्वच्छता करून सहभाग नोंदविला.हा उपक्रम दिनांक 15 सप्टेंबर 2018 ते 2 ऑक्टोबर 2018 कालावधीत लोकसहभागच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
स्वच्छता ही सेवा उपक्रमाच्या माध्यमातून सार्वजनिक जागा,धार्मिक स्थळे स्वच्छ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.स्वच्छता कार्यक्रमास जगदीश माळोदे,प्रवीण दिवाने,अशोक जसुतकर,रुस्तम शेख,पवन नरसिंगकर,लक्ष्मी कौरसिया,कविता गाचले, दुर्गा बडवाने कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
मागील वर्षी सुद्धा सार्वजनिक स्थळे,शासकीय कार्यालये स्वच्छ करून हा उपक्रम राबविण्यात आला होता. यावर्षी सुद्धा कारंजा कार्यक्षेत्रातील शाळा,कॉलेज,सार्वजनिक मंडळ यांनी उत्सुर्फपणे सहभाग नोंदवावे,असे आवाहन नगरपंचायत मार्फत करण्यात आले आहे.
महात्मा गांधीजी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून नगरपंचायत मार्फत स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत वर्षभर स्वच्छताविषयक विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2019 स्पर्धेत कारंजा नगरपंचायतचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे.
नागरिक व संस्था यांनी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यास सहकार्य करावे.-पल्लवी राऊत,मुख्याधिकारी


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.