गरीब-गरजू शालेय विद्यार्थ्याना सायकल वाटप
ऊर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते सायकल वितरण
“एक गाव एक गणपती” या संकल्पनेनुसार कोराडी विद्युत विहार वसाहतीमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्यावतीने यंदा कोराडी परिसरातील गरीब-गरजू शालेय विध्यार्थी-विद्यार्थिनींना शाळेला जाणे-येणे सुकर व्हावे, बस खर्चाची बचत व्हावी म्हणून 17 नवीन सायकली वितरित करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासाच्या प्रांगणात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात माननीय ऊर्जामंत्री यांचे शुभहस्ते प्रतिकात्मक चावी विद्यार्थिनींना प्रदान करण्यात आली व कोराडी,महादूला,नांदा, परिसरातील गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. या अभिनव उपक्रमाबाबत नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी महानिर्मितीच्या अधिकारी-कर्मचारी तसेच सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकऱयांचे विशेष अभिनंदन केले.
याप्रसंगी कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंते अभय हरणे, राजकुमार तासकर, अधीक्षक अभियंता डॉ.भूषण शिंदे, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम, पुरुषोत्तम वारजूरकर, तेजस्विनी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.बी.रेवतकर तर गणेश मंडळाचे पदाधिकारी राजकुमार ढेंगे,संदीप ताजने, राजेश गोरले, विद्यासागर मुंडे,समाधान पाटील, सागर वानखेडे,मनीष पंडेल,गजानन सुपे,विलास भालेराव,विशाल मुल्लेवार, अजय गंधवे, विठ्ठल भालेराव, अशोक गभणे, वैद्यनाथ रूपणार, पुंडलिक सावद, सुनील एकूणकर,आर.पि.कुत्तरमारे, सी.ती. निखाते, हेमंत चौधरी, मिथुन कोडापे,नितीन महल्ले,श्रीपाद पाठक, गणेश पाटील,प्रकाश झा, आशिष पोहरकर,अजय शाही,मुकुंदा भोकरधनकर,बी.डब्ल्यू झाडोकर,गणपती जगताप, बाबा पन्नासे,दिनेश चालखोर, पुरुषोत्तम साबळे,मनोहर बोपचे,एस.एम.वाईकर,दिलीप पाटील, विक्रम अहिरे,शिव द्विवेदी,मनोहर पुंडे,शैलेन्द्र अर्जितवार,विशाल लोंढे,संदीप कवठे,अनिल सुरोडे,धर्मराज बोडे, सचिन नरुले, श्रीकांत टाले,स्वप्नील पाटील,संजय शेरेकर, ओ.व्ही.गुट्टे, निलेश डंबार, अजय पुंड,अजय मांजरीकर, प्रकाश झोहरी, एस.टी.फुंडकर,अमित साठवणे,एस.एस.श्रीवास्तव,अशोक भागवतकर,संदीप हिवरखेडकर,शशिकांत बोडके,अशोक पेंदारे,आर.एच.बांडाबुचे,विष्णू तायडे,संतोष तुराणकर,सचिन येरगुडे,विद्या सोरते,प्रतीक्षा घुरडे,संगीता बोदलकर,तृप्ती कामडी, पूजा महल्ले,अपर्णा स्वामी,प्रगती घोंगे,स्नेहा तेलरांधे,निखीता आशावान,अर्चना ठाकरे,प्रकाश प्रभावत,के.यु.भागवत,दिवाकर देशमुख, मिलिंद रहाटगावकर,धम्मदीप राउत, दीपक चौबे,ईशान मेश्राम,हर्षद खंडारे,स्वस्तिक चौकसे,विशाल मानकर,संदीप ठाकरे,संजय सातफळे, संजय गंधे,सचिन डांगोरे, धर्मदास बोडे,संदीप चौधरी,सीमा शंखपाळे, सुधाकर इंगळे,बी.के.कुळकर्णी, जयंतकुमार भातकुलकर, आर.जी. गोठवाड, सविता गजभिये इत्यादींचा समावेश आहे.
कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे यांचे अध्यक्षतेखाली यावर्षी सामाजिक,प्रबोधनात्मक, शैक्षणिक,सांस्कृतिक व क्रीडात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भरगच्च प्रतिसाद लाभत आहे.