Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, सप्टेंबर १६, २०१८

बालगृहातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करावी:प्रहारची मागणी

 अनाथांचे रक्षकच बनले भक्षक:प्रहार अनाथ संघठन व बच्चू कडू युवा विचार मंचाची मागणी
जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथी स्नेहदीप  बालगृहातील अल्पवयीन निराधार मुलीवर  बलात्कार  करणाऱ्या  बंडू  कुत्तरमारे या नराधमास कठोर  शिक्षा देऊन पिडीतेला न्याय द्यावा. तसेच  राज्यातील बालगृहातील सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करावी अशा आशयाचे निवेदन प्रहार अनाथ संघठन तथा आ . बच्चू कडू युवा विचार मंच यांच्या तर्फे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
         चंद्रपूर शहरातील स्नेहदीप बालगृहातील अल्पवयीन निराधार मुलीवर तेथील काळजीवाहक बंडू कुत्तरमारे याने बलात्कार केल्याची घटना ५ ऑगस्ट २०१८ रोजी  बालकल्याण समिती तर्फे  बालगृहाची तपासणी करण्यात आली यावेळी  उघडकीस आली. त्यावरून रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर प्रकरण शासनाकडून जलदगती न्यायालयामध्ये चालविण्यात यावे तसेच बालगृहातील मुलींच्या सुरक्षेची जबादारी असणाऱ्या अधीक्षक , संचालक मंडळ , संबंधित प्रशासकीय अधिकारी यांनी हलगर्जीपणा  दाखविल्याने त्यांना सुद्धा सह आरोपी ठरवून त्यांच्या वर हि कार्यवाही करावी . जेणे करून समाजातील इतर अनाथ  निराधार मुलींसोबत अशा प्रकाराच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही . तसेच अशा घटना इतर ठिकाणी घडू नये या करिता राज्यातील सर्व जिल्हातील  बालगृह , अनाथालय , वसतिगृहे यातील सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करून जिल्हा पातळीवर शासकीय व निमशासीय, अनाथ संघटनेचे सदस्य घेऊन  समिती स्थापन करावी . सदर प्रकरण येत्या १ महिन्यात जलद प्रक्रिया न्यालयामध्ये न चालविल्यास  प्रहार जनशक्ती पक्षाच्या अनाथ संघटने तर्फे राज्यातील अनाथांना घेवून प्रहार स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल .असे निवेदनात नमूद केले असून यावेळी प्रहार अनाथ संघठन चे विदर्भ  संघटक अमीत वासनीक.  प्रहार कार्यकर्ते " प्रशांत कारेकर ' संजय तोंगट्टिवार  ,सामाजिक कार्यकर्ते  अजय बोंदगूलवार 'बच्चू कडू युवा विचार मंचाचे संदीप झाडे', निलेश ढवस', नितीन नागरकर, गणेश उराडे,राहुल चौधरी,आशीतोश सातपूते,प्रशांत आडे,आशीष गेडाम तथा आ बच्चू कडू युवा विचार मंचाचे इतर सदस्य  उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.