Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, सप्टेंबर ०४, २०१८

रविवारी कुमार सानू नागपुरात

नागपूर : ख्यातनाम बॉलिवूड गायक कुमार सानू येत्या नऊ सप्टेंबर रोजी नागपुरात येत असून, रात्री आठ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात गाण्यांचा कार्यक्रम होत आहे़ नागपूर इव्हेंटच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात कुमार सानू जुन्या आणि नवीन सिनेगितांची मैफ ल सादर करणार आहे़ ९० च्या दशकातील प्रसिद्ध गायक कुमार सानूने रसिकांच्या मनावर राज केले होते़ चुरा के दिल मेरा, तुझे देखा तो ये जाना सनम, एक लडकी को देखा तो, मेरा दिल भी कितना पागल है, यासारखी सुपरहिट गाणी त्यांनी गायली आहे़


Image result for kumar sanu
या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता अमीत नागदिवे, नदीम खान, गोविंद तोतडे, विजय सोनपितळे, मुकेश नायडू प्रयत्न करीत आहेत़

तिकीट येथे बुक करा
https://in.bookmyshow.com

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.