Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै ०७, २०१८

दारूच्या बाटलांवर चालला बुलडोजर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्याात १ एप्रिल २०१५ पासून पासुन दारूबंदी घोषीत करण्यात आली. त्याअंतर्गत चंद्रपुर जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत दारूबंदी बाबत गुन्हे नोंद करण्यात आले असुन त्यामध्ये मोठया प्रमाणात दारूचा साठा सुध्दा जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांनी विषेश मोहिम राबवुन सतत पाठपुरावा करून मा. कोर्ट चंद्रपुर यांचे कडून दारूच्या गुन्हयातील मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश प्राप्त केलेले आहेत.स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर आणि दारूबंदी विभाग यांचे संयुक्त कार्यवाहीने चंद्रपुर जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत जप्त मुद्देमाल नष्ट करण्याच्या कार्यवाहीला सुरूवात करण्यात आली असुन दिनांक 06/07/2018 रोजी पोलीस स्टेशन सावली येथील 36 गुन्हयातील एकुण 28,64,790/-रू. दारूचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
तर पोलीस स्टेशन दुर्गापुर येथील 61 गुन्हयातील 6,88,000/-रू चा मुददे्माल नष्ट करण्यात आला आहे. आज दिनांक 07/07/2018 रोजी पोलीस स्टेशन राजुरा येथील 10 गुन्हयातील 11 लक्षचा मुद्देमाल, पोलीस स्टेशन पडोली येथील 99 गुन्हयातील 39,99,150/-रू चा मुद्देमाल तसेच पोलीस स्टेशन भद्रावती येथील 335 गुन्हयातील मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही श्रीमती नियति ठाकर,पोलीस अधीक्षक चंद्रपुर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. हेमराजसिंह राजपूत यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन दुर्गापुर प्रभारी पोनि श्री.यादव, पोस्टे सावली पोनि श्री. धुळे, पोस्टे भद्रावती पोनि श्री. मडावी, पोस्टे राजुरा पोनि श्री. कोकाटे, पोस्टे पडोली सपोनि. श्रीमती ढाले आणि संबंधीत पोलीस स्टेशन अधिकारी आणि कर्मचारी यांनी पार पाडली.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.