नागपूर/ललित लांजेवार:
चंद्रपुर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यानजीकच्या पवनी 2 च्या वेकोली खदाणीत वेकोली प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे कोट्यायवधीचा चुना लागला आहे.जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे खदानी नजीक असलेल्या नाल्याच्या बांध फुटला,आणि सर्व पावसाचे पाणी हे खदाणीत घुसले.विशेष म्हणजे वेकोली प्रशासनाला पावसाळा पूर्वी नियोजन करणे आवश्यक असते मात्र व्यवस्थापन विभागाने याकडे गांभीर्याने बघितले नसल्याने त्याचा फटका वेकोलीच्या पवनी 2 खदाणीला बसला आहे.खादणीत सर्वत्र पाणी शिरले असून काही मशनरी सुरक्षित खदानी बाहेर काढण्यात आले असून खनन कार्यासाठी लागणाऱ्या छोट्या-मोठ्या अशा काही यंत्र सामुग्री पाण्याखाली आली असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. हे संपूर्णपणे करण्यासाठी जवळपास पंधरा दिवसाचा अवधी लागणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे व त्यामुळे कोळशाच्या उत्पादनावर त्याचा प्रभाव बघायला मिळणार आहे संपूर्ण प्रकाराबाबत खान प्रबंधक यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केले असता संपर्क होऊ शकला नाही.