- नगर परिषदच्या सत्ता बदलानंतर यश
चिमूर/प्रतिनिधी
चिमूर नगर परिषद च्या स्थापनेला अडीच वर्षाच्या कार्यकाळात भाजप ची सर्वच स्तरावर सत्ता असताना सुद्धा कायमस्वरूपी ,अनुभवी अधिकारी पद स्थापना रिक्त होती त्यामुळे कामे होण्यास दिरंगाई होत होती परंतु अडीच वर्षाच्या सत्ता बदला नंतर कांग्रेस ची सत्ता आल्यावर वरीष्ठ प्रशासकीय स्तरावरून प्रयत्न पत्र व्यवहार करून अखेर चार अधिकारी शासना ने पद स्थापणेवरून भरली आहे
चिमूर नगर परिषद ची सत्ता भाजप च्या काळात असताना अनेक पद स्थापणेची पदे रिक्त होती परंतु ढिसाळ शासन कार्यकाळ असल्याने पदे भरण्यात किवा शासना कडून रिक्त पदे भरण्यास असफल झाले त्या मुळे शासकीय योजना हया नगर परिषद मार्फत न होता सार्वजनिक बांधकाम विभाग कडून होत होत्या अडीच वर्षांनंतर सत्ता परिवर्तन होऊन कांग्रेस ची सत्ता चिमूर नगर परिषद वर येताच एका महिन्याच्या कार्यकाळात पत्रव्यवहार करून शासन प्रशासन ने दखल घेत अखेर चार अधिकारी आले त्यात लेखा परीक्षक,संगणक अभियंता विद्युत अभियंता व आरोग्य विभाग चे अधिकारी पदे भरण्यात आले आहे
कांग्रेसचे जिप गट नेते डॉ सतीश वारजूकर याचे मार्गदर्शनात व नगराध्यक्ष गोपाल झाडे यांचे नेतृत्वात नगर परिषद मधील इतर शिल्लल्क अधिकारी आणण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगत चिमूर चा सर्वांगीण विकास हेच ध्येय असल्याचे नगरसेवक विनोद ढाकुंनकर यांनी सांगितले