रामटेक ( तालूका प्रतिनिधी ):
महाराष्ट्र शासनाकडून लागू झालेल्या महाराष्ट्र प्लास्टिक निर्मूलन कायद्यांतर्गत केलेल्या नवीन तरतुदीनुसार आज रामटेक नगर परिषदेतर्फे प्लास्टिक शोधमोहीम व जप्ती मोहीम ची कारवाई करण्यात आली.सदर कारवाईची सुरुवात फेरीवाल्या पासुन रामटेक बसस्थानकातील परिसरातून सुरुवात करून अनेक मोठे प्रतिष्ठान सुद्धा प्लास्टिक शोधमोहीम जप्तीची मोहीम राबवण्यात आली यामध्ये खालील प्रतिष्ठानांमध्ये प्लास्टिक आढळून आले ज्यामुळे त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली.रामटेक शहरातील एकून १८ प्रतिष्ठानांवर प्लास्टिक आढळल्यामुळे कारवाई करण्यात आली ज्यामध्ये एकूण ७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.या मोहिमेत विशेष करून गायत्री एजन्सी रामटेक
श्रीकृष्ण दूध डेअरी
मराठा भोजनालय
रोहित किराणा स्टोर्स आणि इतर
१४ दुकानांमध्ये प्लास्टिक आढळून आले.सदर दुकानदारांवर या कायद्यांतर्गत प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार असून दुसऱ्यांदा सदर प्लास्टिक या दुकानात सापडल्या दहा हजार रुपये दंडाची तरतूद या कायद्यात आहे.या कार्यवाहीमध्ये मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या नेतृत्वात जप्ती अधिकारी म्हणून अमित कावळे व इतर कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.