शेतकरी तथा बेरोजगार युवकांना शेतीपूरक जोडधंद्याच्या माध्यमातून आर्थीकरित्या सक्षम करण्यासाठी स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने वेंडली येथे आयोजीत केलेल्या चार दिवसीय पशुसंगोपन अभियानाला बेरोगार व शेतक-यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत तीन दिवसात जवळपास 380 मुलांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला आहे. गुरुवारी या कार्यशाळेचा समारोप होणार आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी शेतकरी संकटात सापडत असतो. यातून मार्ग काढत त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने या चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार पासून सुरु झालेल्या या कार्यशाळेला ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत असून या तीन दिवसात शास्त्रोक्त शेळीपालन व्यवसाय, कुक्कुटपाल व्यवसाय आणि मत्स्य व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी गुरुवारला दुग्ध व्यवसाया बाबत प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. शहरात दुध, शेळी, मासे, यांची मोठी मागणी आहें. ही मागणी पुर्ण करण्यासाठी बाहेर राज्यातून मासे आणि शेळ्या चंद्रपूरात पुरवील्या जातात ही बाब लक्षात घेता शहराला लागुन असलेल्या ग्रामीण भागात शेती पूरक जोडधंदे केल्यास येथील शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतो तसेच येथील बेरोजगार युवकांना त्यांचा हक्काचा रोजगार मिळू शकतो या उद्देशाने स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने आणि किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने या चार दिवसीय पशुसंगोपन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून दत्ता इंस्टियुट ऑफ कृषी तंत्रज्ञान व पशुसंगोपन संवर्धन प्रशिक्षण विभाग नागपुर येथील तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.