खड्ड्यांची श्रृंखला किती घेणार जीव ?
चंद्रपूर/ललित लांजेवार:चंद्रपूर शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे ५ दिवसात २ जणांचा जीव जाण्याची घटना ताजी असतांना जिल्ह्यातील राजुरा येथे खड्डे चुकविण्याच्या नादाद आणखी दोन भावांना आपला जीव गमवावा लागला आहे.प्रमोद मालखेडे (वय 32 वर्ष) व विनोद मालखेडे (वय 32 वर्ष) या भावंडांचे नाव आहे.शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास हे दोघेही बाईकनं राजुराहून वरुर रोडच्या दिशेनं प्रवास करत असताना तुलाना गावाजवळ मागून येणाऱ्या अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत एकाचा घटनास्थळीच तर दुसऱ्याचा रुग्णालया मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.दरम्यान राजुरा- लक्कडकोट या मार्गावरील खड्ड्यांमुळे या दोघांचा जीव गेल्याचा आरोप आता स्थानिकांकडून करण्यात येत आहे.चंद्रपूर शहरासोबतच जिल्ह्यात चंद्रपूर-मूल-सिंदेवाही ,सिंदेवाही-नवरगाव-चिमूर, कोरपना,गडचांदूर, या सोबत जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी राज्य मार्गावर ठीक ठिकाणी खड्डे पडले आहे.पावसाळ्याच्या सुरुवातीच्याच पाण्यात जिल्ह्यातील रस्त्यावर पडलेल्या खाड्यांमुळे रस्त्याच्या दर्जाचे पितळ उघळे पडले आहे,त्यामुळे जिल्हा प्रशासनाने व संबंधित विभागाने तात्काळ जिल्ह्यातील विविध ठिकाणी पडलेले खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी ना
गरिक करत आहे.
गरिक करत आहे.
काव्यशिल्पच्या बातमीची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली दखल
५ दिवसात २ महिलांचा खड्डे वाचविन्याच्या नादात मृत्यू झाल्याच्या मथळ्याखाली काव्यशिल्प डिजिटल मीडियाने बातमी प्रकाशित केली होती. या दोन्ही अपघातात हेल्मेट असता तर जीव वाचला असता असे काव्यशिल्पच्या देखरेखीत निष्पन्न झाले, याच बातमीची दखल घेत शुक्रवारी चंद्रपूर पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी दुपारी ४ वाजता पासून संपूर्ण जिल्ह्यात हेल्मेट विषयी जनजागृती व दंड आकारणे मोहीम सुरु केली.वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेत हो मोहीम अहिक तीव्र करणार असल्याचे त्यांनी काव्यशिल्पशी बोलतांना सांगितले. येत्या काही दिवसात चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्त्तेक दुचाकी स्वरांसाठी हेल्मेट बांधणकारक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट लावणे आवश्यक
दररोज वर्तमानपत्रे उघडली, वृत्तवाहिन्यांचे चॅनेल्स लावली अथवा आकाशवाणीवरील बातम्या ऐकल्या तरी देशात कुठे ना कुठे अपघात झाल्याचे आणि त्यात कोणीतरी जीव गमावल्याचे वृत्त असतेच . मात्र, दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरल्याने अथवा चारचाकी गाडीत बसल्यानंतर सीटबेल्ट न लावल्याने मृत्युमुखी पडणार्या लोकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे,त्यामुळे शहर वगळता शहराबाहेर निघणारे राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट लावणे आता गरजेचे झाले आहे ,चंद्रपूर जिल्ह्यात सध्या हेल्मेट विषयाची जनजागृती सुरु असून जिल्ह्यात लवकरच हेल्मेट सख्तीचे होणार आहे.