Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

राजुरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राजुरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, नोव्हेंबर १५, २०२०

कुटुंबाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आदिवासी युवक युवतींना सामाजिक कार्यात सहभागी करण्याची गरज : घनशाम मेश्राम

कुटुंबाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आदिवासी युवक युवतींना सामाजिक कार्यात सहभागी करण्याची गरज : घनशाम मेश्राम




राजुरा / प्रतिनिधी
दिनांक १५/११/२०२०
राजुरा येथील बामनवाडा येथे बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली असून भगवान बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून श्रमिक एलगर चे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. भगवान बिरसा मुंडा यांनी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी उलगुलान उभा केला असून त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन प्रगती कडे वाटचाल करावी तसेच आदिवासी युवक युवतींना सामाजिक कार्यात सहभागी करून कुटुंबाचा सर्वांगीण विकास करावा यासाठी सामाजिक कार्यात युवक युवतींना सहभागी करण्यासाठी मातृ शक्तीने पुढाकार घ्यावा असे मत मेश्राम यांनी व्यक्त केले.

बिरसा मुंडा यांच्या जयंतनिमित्त प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले व सप्तरंगी झेंडा फडकावला.

यावेळी आदर्श शिक्षक बंडू मडावी, डा.मधुकर कोटणाके, धीरज मेश्राम सर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात संतोष कुळमेथे, रमेश आडे सर, बाळकृष्ण मसराम सर, अभिलाष परचाके, प्रमोद कुंभरे, गंगा टेकाम, मिरा कोडापे, गीता आत्राम, भुमिता मेश्राम, संदीप आत्राम, यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

सोमवार, जुलै १६, २०१८

राजूरा येथील श्रेणीवर्धीत उपजिल्हा रूग्णालय इमारत बांधकामाची ना. अहीर यांचेकडून पाहणी

राजूरा येथील श्रेणीवर्धीत उपजिल्हा रूग्णालय इमारत बांधकामाची ना. अहीर यांचेकडून पाहणी

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 राजुरा येथील श्रेणीवर्धीत शंभर खाटांच्या अद्ययावत उपजिल्हा रूग्णालयाच्या नवनिर्मित इमारत बांधकाम स्थळी दि. 14 जुलै रोजी केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी भेट देवून पाहणी केली. सदर कामास गती देवून या इमारतीचे बांधकाम कालबध्द वेळेत पूर्ण करण्याची सुचना संबंधित अधिका-यांनी केली. 
राजुरा उपविभागातील तालुक्यातील रूग्णांसाठी हे रूग्णालय वरदान ठरणार असल्याने आरोग्य सेवा तातडीने उपलब्ध होण्यासाठी या इमारतीचे बांधकाम शिघ्रगतीने व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करून निधी अभावी हे काम रंेगाळणार नाही याची दक्षता घेतली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी राजुराचे आ. अॅड. संजय धोटे, खुशाल बोंडे, अरूण मस्की, उपविभागीय अभिंयता पाचपोर, शाखा अभियंता वैभव जोशी, जि.प. सदस्य सुनिल उरकुडे, डाॅ. लहुजी कुळमेथे, महादेव तपासे, किशोर जयपुलकर, यांची उपस्थिती होती.

रविवार, जुलै १५, २०१८

 चंद्रपुरात खड्ड्यांनी घेतला आणखी दोन भावंडांचा बळी

चंद्रपुरात खड्ड्यांनी घेतला आणखी दोन भावंडांचा बळी

खड्ड्यांची श्रृंखला किती घेणार जीव ?
चंद्रपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूर शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे ५ दिवसात २ जणांचा जीव जाण्याची घटना ताजी असतांना जिल्ह्यातील राजुरा येथे खड्डे चुकविण्याच्या नादाद आणखी दोन भावांना आपला जीव गमवावा लागला आहे.प्रमोद मालखेडे (वय 32 वर्ष) व विनोद मालखेडे (वय 32 वर्ष) या भावंडांचे नाव आहे.शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास हे दोघेही बाईकनं राजुराहून वरुर रोडच्या दिशेनं प्रवास करत असताना तुलाना गावाजवळ मागून येणाऱ्या अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत एकाचा घटनास्थळीच तर दुसऱ्याचा रुग्णालया मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.दरम्यान राजुरा- लक्कडकोट या मार्गावरील खड्ड्यांमुळे या दोघांचा जीव गेल्याचा आरोप आता स्थानिकांकडून करण्यात येत आहे.चंद्रपूर शहरासोबतच जिल्ह्यात चंद्रपूर-मूल-सिंदेवाही ,सिंदेवाही-नवरगाव-चिमूर, कोरपना,गडचांदूर, या सोबत जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी राज्य मार्गावर ठीक ठिकाणी खड्डे पडले आहे.पावसाळ्याच्या सुरुवातीच्याच पाण्यात जिल्ह्यातील रस्त्यावर पडलेल्या खाड्यांमुळे रस्त्याच्या दर्जाचे पितळ उघळे पडले आहे,त्यामुळे जिल्हा प्रशासनाने व संबंधित विभागाने तात्काळ जिल्ह्यातील विविध ठिकाणी पडलेले खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी ना
गरिक करत आहे.
काव्यशिल्पच्या बातमीची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली दखल 
५ दिवसात २ महिलांचा खड्डे वाचविन्याच्या नादात मृत्यू झाल्याच्या मथळ्याखाली काव्यशिल्प डिजिटल मीडियाने बातमी प्रकाशित केली होती. या दोन्ही अपघातात हेल्मेट असता तर जीव वाचला असता असे काव्यशिल्पच्या देखरेखीत निष्पन्न झाले, याच बातमीची दखल घेत शुक्रवारी चंद्रपूर पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी दुपारी ४ वाजता पासून संपूर्ण जिल्ह्यात हेल्मेट विषयी जनजागृती व दंड आकारणे मोहीम सुरु केली.वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेत हो मोहीम अहिक तीव्र करणार असल्याचे त्यांनी काव्यशिल्पशी बोलतांना सांगितले.  येत्या काही दिवसात चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्त्तेक दुचाकी स्वरांसाठी हेल्मेट बांधणकारक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट लावणे आवश्यक
दररोज वर्तमानपत्रे उघडली, वृत्तवाहिन्यांचे चॅनेल्स लावली अथवा आकाशवाणीवरील बातम्या ऐकल्या तरी देशात कुठे ना कुठे अपघात झाल्याचे आणि त्यात कोणीतरी जीव गमावल्याचे वृत्त असतेच . मात्र, दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरल्याने अथवा चारचाकी गाडीत बसल्यानंतर सीटबेल्ट न लावल्याने मृत्युमुखी पडणार्‍या लोकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे,त्यामुळे  शहर वगळता शहराबाहेर निघणारे राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्गावर  हेल्मेट लावणे आता गरजेचे झाले आहे ,चंद्रपूर जिल्ह्यात सध्या हेल्मेट विषयाची जनजागृती सुरु असून जिल्ह्यात लवकरच हेल्मेट सख्तीचे होणार आहे.



सोमवार, एप्रिल २३, २०१८

कार्यक्रमातील जेवणातून शेकडो लोकांना विषबाधा

कार्यक्रमातील जेवणातून शेकडो लोकांना विषबाधा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
राजुरा तालुक्यातील चिंचोली येथील एका देवादेवीच्या समारंभातील जेवणातून जवळपास १०० लोकांना विषबाधा झाल्याचे उघडकीस आले आहे.
तालुक्यातील चिंचोली येथील सुधाकर चौधरी यांचे घरी रविवारी रात्री देवादेवीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी गावातील नागरिक तसेच अन्य नातेवाईक देखील उपस्थित होते,या कार्यक्रमात नागरिकांनी भोजनाचा आस्वाद घेतला मात्र अवघ्या काही वेळातच त्यांच्या प्रकृतीत बिघाड होत डोकं दुखी व पोट दुखी सुरु झाली,अश्या पद्धतीचा त्रास हा संपूर्ण जेवणाऱ्या मंडळींना झाल्याने अशे शेकडो लोक वेगवेगड्या ठिकाणी डोके-पोट धरून बसले होते,त्या नंतर अनेकांना उलट्या देखील झाल्या हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच तत्काळ काही लोकांनी स्थानिक आरोग्यकेंद्रात भरती करण्यात आले. मात्र रुग्णांची संख्या वाढतच जात असल्याने इतर रुग्णांना राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले,मात्र हा संपूर्ण प्रकार कशामुळे घडला याचा शोध घेणे सुरु आहे .या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ.कुलमेथे यांनी सांगितले.



मंगळवार, फेब्रुवारी १३, २०१८

आमदार बाळू धानोरकर यांचे सोबत ६ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल;वीज टॉवर उभारणी प्रकरण

आमदार बाळू धानोरकर यांचे सोबत ६ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल;वीज टॉवर उभारणी प्रकरण

चंद्रपूर:(ललित लांजेवार):
वीज टॉवर उभारणीचे काम करीत असलेल्या एका खाजगी कंपनीच्या व्यवस्थापकाला मारहाण करणारे वरोराचे शिवसेना आमदार बाळू  धानोरकर यांच्यासह ईतर ६ कार्यकर्त्यांवर राजुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 
राजुरा आणि कोरपना तालुक्यात KEC ही कंपनी शेतकऱ्यांना योग्य मोबदला न देता जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या शेतात वीज टॉवर उभारत होते,याला शेतकऱ्यांनी कित्तेकदा विरोध केला मात्र शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता या कंपनीने आपले काम सुरूच ठेवले. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या लगतच्या छत्तीसगड आणि तेलंगणा अशा २ राज्यातून येणा-या भल्या मोठ्या वीज टॉवर लाईन उभारल्या जात आहेत. हे काम करण्यासाठी हजारो हेक्टर उभ्या शेतजमिनीतुन पीक तुडवत काम सुरु आहे. हे काम कोणत्याही शेतक-याच्या मर्जीने कायद्यानुसार होत नाहीये.त्यामुळे चिडलेले शेतकरी यांनी हे वरोराचे शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांच्याकडे पोहचले.धानोरकर यांनी देखील अनेकदा सांगून न ऐकणाऱ्या कंपनीला हिंगा दाखवत कंपनीच्या एका व्यवस्थापकाला चांगलाच चोप दिला,कार्यकर्त्याने काठीने मारत आमदार धानोरकर यांनी कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाच्या थोबाडीत लावली, या मारहाणीच्या विरोधात कंपनीच्या कर्मचारी अबुजकुमार सिंग रा.गडचांदूर याने राजुरा पोलिस स्टेशन येथे आमदार बाळू धानोरकर यांच्यासह ६ कार्यकर्त्यांन विरोधात कलम १८ ,१४३,१४७,१४८,३२३ अंतर्गत गुम्हा दाखल करण्यात आल आहे .