रामटेक तालुका प्रतिनिधीः
रामटेक येथील श्रीराम विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व रा.स्व.संघ,नागपुर जिल्हयाचे माजी संघचालक रामचंद्र मारोतराव देवतारे यांनी या भागात संघविचारांचे सिंचन केले. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण ते संघकार्यासाठी झिजले.संघाचा विचार त्यांनी घराघरांत पोहचविला या शब्दांत प.पुश्रीगुरूजी स्मृती प्रकल्प गोळवलीचे व्यवस्थापक चंद्रशेखर देशपांडे यांनी देवतारे मास्तरांचा गौरव केला. दिनांक 1 जुलै 2018 रोजी स्थानीक गंगा भवनम् सभागृहात सकाळी 11 वाजता संपन्न झाालेल्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते .यावेळी मंचावर रास्वसंघाचे जिल्हा संघचालक प्रकाश ताजने ,विभागाचे
कार्यवाह उल्हास ईटनकर सत्कारमुर्ती रामचंद्र देवतारे, सौ.चंद्रभागा देवतारे,नगर संघचालक अधिवक्ता किशोर नवरे आदी मान्यवर हजर होते. नागपुर जिल्हयातील रास्वसंघाचे अधिेकारी पदाधिकारी व देवतारे मास्तर यांचे चाहते मोठया संख्येत कार्यक्रमाला हजर होतेअमृतमहोत्सव कार्यक्रमात देवतारे यांचा सपत्निक सत्कार चंद्रशेखर देशपांडे व त्यांच्या पत्नी वनिता देशपांडे यांच्या हस्ते करण्यांत आला.रामटेकच्या सार्वजनिक
क्षेत्रांतील सामाजीक,सांस्कृतीक व राजकीय संघटना व पदाधिकारी यांचेकडूनही त्यांचा यथोचित सन्मान करण्यांत आला.कार्यक्रमांत जुन्या रामटेक तालुक्यातील व सध्या मौदा तालुक्यात असलेल्या खात या गावात सामान्य कुटूंबात रामचंद्रराव यांचा 1 जुलै 2018 रोजी जन्म झालावडील रेल्वेत सिग्नल फीटर होते.मोठे बंधू शामराव यांनी बोट धरून त्यांना संघाच्या शाखेत आणले.अत्यंत प्रतिकुल परीस्थितीत रामचंद्रराव यांनी डबल एम ए पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. व रामटेकच्या श्रीराम विद्यालयांत शिक्षकाची नोकरी धरली.पुढे ते या शाळेचे मुख्याध्यापक झाले.रास्वसंघाचे अतिशय निष्ठेने कार्य करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांचे नाव संपुर्ण नागपुर विभागात मोठया सन्मानाने घेतले जाते.विविध जबाबदाऱ्या सांभाळत असतांना त्यांनी नागपुर जिल्हा संघचालक या पदावर अनेक वर्षे कार्य केले.रामटेकचे तरूण भारतचे वार्ताहर म्हणूनही त्यांनी सुमारे 25 वर्षे कार्य
केले आहे.रामटेकच्या संघ कार्यकर्त्यांसह सर्वच सामाजिक क्षेत्रांतील कार्यकर्त्यांचे ते मार्गदर्शक आहेत.रामटेकच्या सार्वजनिक क्षेत्रांतील या आधारवडाचा अमृतमहोत्सव हा या सर्वच कार्यकर्त्यांसाठी अतिशय आनंदाचा विषय होता व त्यामुळेच त्यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमाला नागपुर जिल्हयातुन संघाचे अधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित होते.रामटेकचे आमदार डी.मल्लिकार्जु न रेड्डी,नागपुर जिल्हा भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख विकास तोतडे,रामटेकच्या श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव डॉप्रशांत पांडे,रामटेक नगरपालीकेच्या माजी उपाध्यक्षा कविता मुलमुले,भाजपाचे संजय मुलमुले,नगरसेवक संजय बिसमोगरे,सौ रत्नमाला अहिरकर,विवेक तोतडे,माजी उपाध्यक्ष मन्साराम अहिरकर,नागपुर जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य राहुल
पेटकर,समर्थ विद्यालयाचे पर्यवेक्षक दिपक गीरधर,वनवासी कल्याण आश्रमाचे मध्यप्रांताचे संघटन मंत्री प्रविण डोळके,बाजार समीतीचे संचालक चरणसिंग यादव,सुघीर धुळे,राजेंद्र पाठक,योगेश मेडसिंगे ,हितेंद्र चोपकर,चेतन चोपकर,डॉ.मिलींद चोपकर,अरविंदराव तोतडे,केशवराव चित्रिव,सुरेश भगत,मनोहर वांढरे,चंद्रशेखर जोशी,श्रीधर धुळे आदी मान्यवरांसह देवतारे मास्तरांचे चाहते शेकडो कार्यकर्ते यावेळी
उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेसमोर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यांत आले.शुभम चोपकर यांच्या बासरीवादनाने व देवतारे या नातवंडाच्या गणेश स्तवनाने कार्यक्रमाचे वातावरण भारून टाकले होते.यावेळी देवतारे मास्तरांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी व त्यांचा गुणगौरव करणारी कुमारी गौरी देवतारे,रमेशराव कोळमकर, विवेकराव आंबेकर,भारती येवतीकर,प्रविण डोळके ,उद्धव यांची समयोचित भाषणे झालीत.कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने करण्यांत आलाकार्यक्रमाचे आयोजन भानुप्रताप देवतारे,नागेश देवतारे,भारती देवतारे येवतीकर, मंगेशसिह येवतीकर,योगीता देवतारे कचवे व मनीषसिंह कचवे यांनी केले होते.
वेळी देवतारे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आपल्यावर कार्यकर्ते प्रेम करतात ही आपल्या जीवनातील अमूल्य ठेव असून शेवटच्या श्वासा पर्यत संघकार्य करण्याचा निश्चय व्यक्त केला.यावेळी त्यांनी खात येथील संघकार्यालयासाठी व रामटेकच्या मागास वस्तीत चालणाऱ्या अभ्यासिकेसाठी प्रत्येकी 35 हजार रूपयांची
देणगी नगदी स्वरूपात दिली.गोळवली येथील प्रकल्पासाठी त्यांनी 5 हजार रूपयांचा निधी चंद्रशेखर देशपांडे यांच्या स्वाधीन केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन त्रिलोक मेहर यांनी केले तर उपस्थित सर्वांचे भानुप्रताप देवतारे यांनी आभार मानले.