काल दिनांक ७/७/२०१८ रोजी रात्री ११ ते ११.३० वा सुमारास ४० ते ५० नक्षलवादी इसरु पोटावी याच्या घरी येवून त्याला मारहाण करत सोबत घेऊन निघाले. यावेळी इसरुचे वडील नामे चैतु पोटावी,भाऊ बिजू,पत्नी जयवंती,मुले रमेश,आकाश,अक्षय यांनी नक्षलवाद्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना नक्षल्यानी दमदाटी व मारहाण केली व इसरु यास सोबत घेउुन गेले.
काही वेळानंतर इसरुचा मृतदेह गावाच्या बाहेरील रस्त्यावर गावकऱ्यांना आढळून आला.इसरु हा स्वस्त धान्य दुकान चालवत होता.त्याच्याकडे या दुकानातूनच रुपये १ लाख जमा झालेले होते.त्याने सदर रक्कम ही घरात ठेवलेली होती.नक्षलवाद्यांनी ही रक्कम इसरुच्या घरातून चोरून नेली.
काहीही कारण नसताना नक्षलवादी निरपराध आदिवासी तरुणांच्या हत्या करतात.या खुनानंतर व या अगोदर देखिल अशाच प्रकारच्या निष्पाप आदिवासींच्या केलेल्या निर्घृण खुनामुळे नक्षलवादी हे केवळ आपल्या तुंबडी भरण्यासाठी भिती पसरवून आदिवासी बांधवांना त्यांच्या न्याय हक्कांपासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत हे स्पष्ट होते.