Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै १३, २०१८

चंद्रपुरात खड्डे चुकविण्याच्या नादात १९ वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू

हेल्मेट असता तर वाचला असता जीव 
नागपूर/ललित लांजेवार:
रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात चंद्रपूर येथील एका १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १२ वाजताच्या सुमारास चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प परिसरात घडली,काजळ उत्तम पॉल राहणार शामनगर चंद्रपूर असे या मृत्त निर्दोष तरुणीचे नाव आहे, ट्रक क्रमांक MH.34. 7324 kgn ट्रान्सपोर्ट बाल्लारशाह वरून सावरकर चौक येत असतांना मृत्यू तरुणी आपल्या गाडीने क्रमांक.MH. 34.AW.1522 गाडी ने बंगाली कॅम्पकडे जात असतांना रस्त्यावरील खड्डे चुक्वितांना हा अपघात घडला . चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र पहिल्याच पावसात मोठ मोठे खड्डे पडले अश्यातच ९ जुलै रोजी चंद्रपूर येथील वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर वडगाव येथील रहिवासी नंदा बेहराम या शिक्षिकेचा खड्डे चुकविण्याच्या नादाच मृत्यू झाला होता. हि घटना ताजी असतांनाच बंगाली कॅम्प येथे आणखी एका निर्दोष १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला,या अपघातानंतर ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात असून परिसरातील काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते व मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 




चंद्रपुरात दरवर्षी खड्डे चुकविण्याच्या नादात दरवर्षी अनेक निर्दोष नागरिकांचा बळी जातो. मात्र याकडे स्थानिक प्रशासन व आमदार खासदार मंत्री महोदय व संबंधित विभागाचे अधिकारी गांभीर्याने बघत नाही, तसेच वर्ष भाराअगोदर बनलेला रस्ता एका पावसात फुटल्या जातो.त्यामुळे रस्त्याच्या दर्जाचा प्रश्न देखील या अपघाताला कारणीभूत आहेत.सत्ताधारी विकास कामांकडे करोडो रुपये खर्च करीत आहेत मात्र शहरातील नागरिकांच्या मुलभूत गरजाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे अनेक निर्दोष नागरिकांचा बळी जात आहे.

चंद्रपूर शहरात प्रवेश करण्यासाठीचा आणि तेलंगणा राज्यात जाण्यासाठी वापरावा लागणार एकमेव मार्ग म्हणजे मूल मार्ग. या मार्गावर असलेला सर्वाधिक वर्दळीचा चौक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर चौक. याच चौकात लावलेले बाहुबली हेल्मेटण घालून असलेले हे पोस्टर गेल्या काही दिवसा अगोदर शहरभरात चर्चेचा विषय ठरला होता .‘जेव्हा बाहुबली हेल्मेट घालू शकतो तर आपण का लाजता’.असा मजकूर देखील यावर लिहिला होता, चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभागाने अत्यंत नेमक्या जागी योग्य विषयाला हात घातलेले हे पोस्टर लावल्याने या चौकातील प्रत्येकाच्या नजरा यावर खिळून राहत आहेत. चंद्रपूर शहरात हेल्मेटची फारशी सक्ती नाही मात्र अंतर्गत मार्ग महाराष्ट्र-तेलंगणा राज्याला जोडणारा राज्य महामार्गाचा भाग आहे. म्हणूनच या मार्गावर अपघाताचे प्रमाण देखील अधिक आहे. हे टाळण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने लढविलेली शक्कल चर्चेचा विषय ठरली होती. मात्र परिवहन विभाग नुसते पोस्टर लाऊन गप्प बसले अन प्रत्यक्षात जनजागृती करण्यासाठी विसरले असे या पोस्टरबाजी व आजच्या अपघातावरून लक्षात येते.
हेल्मेट असता तर वाचला असता जीव
शहरातील या दोन्ही अपघात हेल्मेट असता तर कदाचित जीव वाचला असता अशी चर्चा सुरु आहे,गेल्या कधी दिवसान अगोदर चंद्रपूरच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने याबाबत जनजागृतीसाठी बाहुबलीचे लावलेले हेल्मेट घातलेले पोस्टर शहरातील विविध ठिकाणी लावले होते मात्र नुसते पोस्टर लाऊन विभागाने आमचे काम सुरु असल्याचे दाखवून दिले मात्र प्रत्यक्षात असे काहीही घडले नाही. 
Niyati Thaker साठी इमेज परिणामआजपासून जनजागृती अभियानाचा वेग वाढणार 
या अपघातानंतर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी पोलीस विभागाला हेल्मेट विषयी जनजागृती करण्याची मोहिम वेगाने राबविण्याचे आदेश दिले आहे.गेल्या ६ महिन्या अगोदरच हि जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती मात्र शहरात घडलेल्या दोन अपघातानंतर या मोहिमेला पोलीस विभाग आणखी वेग देणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी काव्यशिल्पशी बातचीत करतांना सांगितले.
लोकांना सवय नसल्याने व जनजागृती करण्यात बराच कालावधी लागत असल्याने येत्या कधी दिवसात अपघात रोकण्यासाठी लवकरच जिल्हात हेल्मेट सक्ती होणार आहे.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.