वीज दुरुस्तीचे काम करीत असताना खांबावर जिवंत विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने एका वीज कर्मचाऱ्याचा करुण अंत झाला. विनोद वासुदेवराव टेंभेकर (वय ३०) असे मृताचे नाव आहे. टेंभेकर मानकापूरच्या डोळे ले-आऊटमध्ये राहत होते. ३ जूनच्या पहाटे जरीपटक्यातील मयूरनगरात वीज पुरवठा खंडित झाल्याने ते वीज मंडळातील आपल्या सहकाऱ्यांसह पहाटे ५ वाजता मयूरनगरात गेले. खांबावर चढून दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक त्यांना विजेचा करंट लागला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी ५.४५ वाजता डॉक्टरांनी टेंभेकर यांना मृत घोषित केले. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यांच्या मृत्यूमुळे टेंभेकर परिवाराने कर्ता पुरुष गमावला आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
रविवार, जून १०, २०१८
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
सावधान! वीजबिलासंदर्भातील बनावट एसएमएस | MSEDCL | cybercrime (adsbygoogle = window.adsbygoogle || []).pu
अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू नवरगाव/प्रतिनिधी:सिंदेवाही मार्गावरील लाडबोरी गाव
अपघातात जखमी झालेल्या बिबट्याच्या अखेर मृत्यू नागपूर/प्रतिनिधी:चंद्रपूर शहरालगत मुल मार्गावर लो
क्रांतीदिनी राष्ट्रसंतांच्या या कार्याची झाली आठवण | Tukdoji maharaj krantidin ९ ऑगस्ट क्रांतीदिन श्री गुरुदेव सेवाश्रम साजरा श्
रेल्वेच्या धडकेत ३५ शेळ्यांचा जागीच मृत्यूचंद्रपूर/प्रतिनिधी:रेल्वेच्या धडकेत ३५ शेळ्यांचा
नागपुरातील "हा" पूल होणार इतिहासजमा; 19 पासून "या" मार्गात वाहतूक बंद Railway Station Flyover Demolitioनागपूर : बहुप्रतिक्षित टेकडी उड्डाणपूल पाडण्याचे
- Blog Comments
- Facebook Comments