Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून ०५, २०१८

करिअरनामा;शासकीय नौकर भरती २०१८

करिअरनामा

रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल्स,सब इन्स्पेक्टरच्या ९७३९ जागांसाठी अशी होईल भरती प्रक्रिया-

🔅 भरती प्रक्रियेचे तीन टप्पे-

१. संगणकाधारित चाचणी

२. शारिरीक पात्रता चाचणी व शारिरीक मोजमाप चाचणी

३. कागदपत्रांची पडताळणी 

१. संगणकाधारित चाचणी -

🔅महाराष्ट्रातील उमेदवारांना ही चाचणी मराठीतून देता येईल

🔅परीक्षेचा दर्जा हा पदवीच्या स्तराचा असेल

🔅प्रत्येक बरोबर प्रश्नाला एक गुण तर १/३ गुण प्रत्येक चुकीच्या उत्तरातून होणार वजा

🔅चाचणी कालावधी- ९० मिनिटे

🔅प्रश्नांची संख्या- १२०

🔅विषयनिहाय गुण- सामान्य ज्ञान (५० गुण), अंकगणित (३५ गुण) आणि सामान्य बुद्धिमत्ता आणि तार्किक (३५ गुण)

२. शारिरीक पात्रता चाचणी आणि शारिरीक मोजमाप चाचणी-

संगणकाधारित चाचणीत उत्तीर्ण उमेदवारांना शारिरीक पात्रता चाचणी आणि शारिरीक मोजमाप चाचणीसाठी बोलावले जाणार

🔆 कॉन्स्टेबल्स पदासाठी शारिरीक पात्रता चाचणी-

🔅 पुरुष उमेदवारांसाठी -

● १६०० मीटर ५ मि. ४५ सेकंदात धावणे 

● उंच उडी- ४ फूट

● लांब उडी- १४ फूट

🔅 महिला उमेदवारांसाठी- 

● ८०० मीटर ३ मि. ४० सेकंदात धावणे 

● उंच उडी- ३ फूट

● लांब उडी- ९ फूट

🔆 सब इन्स्पेक्टर पदासाठी शारिरीक पात्रता चाचणी- 

🔅 पुरुष उमेदवारांसाठी- 

● १६०० मीटर ६ मि. ३० सेकंदात धावणे 

● उंच उडी- ३ फूट ९ इंच

● लांब उडी- १२ फूट

🔅 महिला उमेदवारांसाठी- 

● ८०० मीटर ४ मिनिटात धावणे 

● उंच उडी- ३ फूट

● लांब उडी- ९ फूट

शारिरीक पात्रता चाचणी आणि शारिरीक मोजमाप चाचणीनंतर पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.