Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून ०६, २०१८

गंगुबाई जोरगेवार ‘मातोश्री’ पुरस्काराने सन्मानित

टोपल्या विकून मुलाबाळांचा सांभाळ ;पुणे येथे रंगला सत्कार सोहळा
चंद्रपूर/प्रतिनिधी:
किशोर जोरगेवार यांच्या आई गंगुबाई जोरगेवार यांना ‘मातोश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे हा सत्कार सोहळा नुकताच पार पडला आहे या सत्कार सोहळ्यात शिवसेना नेते तसेच बुरुड समाजाचे भूषण खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गंगुबाई जोरगेवार यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अखिल बुरुड समाज महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, महापौर मुक्ता टिळक, संस्थेचे अध्यक्ष विकास नागे, महिला आघाडीच्या अध्यक्ष वैजंतीताई खैरे, सरचिटणीस एम.बी.साळुंखे, विदर्भ प्रांत बुरुड समाज अध्यक्ष किशोर जोरगेवार, विकास सूर्यवंशी, सुभाष सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी या मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. 
महिलांनी जेव्हा जेव्हा बंड पुकारला तेव्हा तेव्हा एक नवी क्रांती घडली हा या देशाचा इतिहास आहे. असाच एक परिस्थिती विरोधातील संघर्ष चंद्रपुरातील गंगुबाई जोरगेवार यांनी पतीच्या निधनानंतर आजपासून २५ वर्षापूर्वी सुरु केला विपरीत परिस्थिती असली तरी जिंकण्याचि जिद्द उराशी बाळगून टोपल्या विकण्याचा छोटासा व्यवसाय सुरु केला. आणि यातून मिळेल त्या अल्प पैश्यातुन ३ मुली व २ मुलांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या या संघर्षाला आज मोठे फलित आले असून आज जिल्ह्यातील प्रतिष्ठीत घराणे म्हणून जोरगेवार घराणे समोर आले आहे. त्यांचा एक मुलगा किशोर जोरगेवार यांनी राजकारणात ठसा उमटवला असून त्यांची समाजासाठी मोठे कार्य सुरु आहे. तर लहान मुलगा हा उत्तम व्यावसायिक बनला आहे. गंगुबाई यांच्या या संघर्षाचे मोठे यश असून त्यांच्या या संघर्षाचि पावती म्हणून त्यांचा अखिल बुरुड समाज महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे ‘मातोश्री’ पुरस्कार देऊन पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे सुपुत्र, किशोर जोरगेवार, प्रशांत जोरगेवार, सुना, कल्याणी जोरगेवार, रंजिता जोरगेवार, नातवंड कोमल जोरगेवार, कामिनी जोरगेवार, प्रसाद जोरगेवार, यथार्थ जोरगेवार यांची उपस्थिती होती. आज जोरगेवार घराण्याची परिस्थिती बदलली असली तरी ‘गरिबी आली तर लाजायचं नाही आणि श्रीमंती आली तर माजायचं नाही’ या उक्ती प्रमाणे गंगुबाई आजही मनपा समोर फुटपाथ वर टोपल्या विक्रीचा व्यवसाय नित्य नियमाने करीत आहे हे विशेष.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.